coronavirus: 18 दिवसांच्या लॉकडाऊन काळात मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचाचण्या आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 03:04 PM2020-07-19T15:04:12+5:302020-07-19T15:04:30+5:30

मीरा भाईंदर मध्ये मार्च अखेरीस पासून कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरवात झाली . 18 जुलै पर्यंत  पालिकेने 19 हजार 201 इतक्या कोरोनाच्या चाचण्या केल्या आहेत. या तील जवळपास निम्म्या 8 हजार 878 कोरोना चाचण्या ह्या महापालिकेने अवघ्या 1 ते 18 जुलै या 18 दिवसांच्या कालावधीत केल्या आहेत . 

coronavirus: Mira Bhayander has the highest incidence of coronavirus and patient recovery during 18 days of lockdown | coronavirus: 18 दिवसांच्या लॉकडाऊन काळात मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचाचण्या आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक  

coronavirus: 18 दिवसांच्या लॉकडाऊन काळात मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचाचण्या आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक  

Next

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये 30 जून पर्यंतच्या मागील 3 महिन्यात कोरोना चाचण्यांची संख्या 10 हजार 423 आणि कोरोना रुग्णांची बरे होण्याची संख्या 2364 इतकी होती . परंतु लॉकडाउनच्या जुलैच्या अवघ्या 18 दिवसांच्या कालावधीत तब्बल 8 हजार 878 चाचण्या करण्यात येऊन 2 हजार 555 रुग्णांना बरे करून घरी सोडले आहे . कोरोना चाचणी व रुग्ण बरे होण्याचे 18 दिवसातील प्रमाण हे विक्रमी असून दिलासादायक आहे . पण त्याच बरोबर या 18 दिवसात 3096 नवे कोरोना रुग्ण शोधून काढण्यात आले व 74 लोकांचा मृत्यू देखील झाला आहे . 

मीरा भाईंदर मध्ये मार्च अखेरीस पासून कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरवात झाली . 18 जुलै पर्यंत  पालिकेने 19 हजार 201 इतक्या कोरोनाच्या चाचण्या केल्या आहेत. या तील जवळपास निम्म्या 8 हजार 878 कोरोना चाचण्या ह्या महापालिकेने अवघ्या 1 ते 18 जुलै या 18 दिवसांच्या कालावधीत केल्या आहेत . 

18 जुलै पर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 422 तर यातून बरे झालेल्यांची संख्या 4 हजार 919 इतकी आहे . कोरोनाने आता पर्यंत शहरात 219 लोकांचा बळी घेतला आहे . नव्याने नियुक्त केलेले आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी आल्या पासून सर्वेक्षण , कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यासह रुग्णांच्या उपचारावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे आकडेवारी वरून दिसून आले आहे . 

जून अखेरच्या गेल्या तीन महिन्यात कोरोना तुन बरे होणारे 2364 रुग्ण होते . परंतु जुलैच्या 18 दिवसात तब्बल 2 हजार 555 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत . यावरून पालिकेच्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक देखील केले जात आहे . कारण रुग्ण बरे होण्याची हि अवघ्या 18 दिवसातील संख्या विक्रमी अशीच आहे . 

परंतु कोरोना मुळे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे . 3 महिन्यात 145 रुग्णांचे मृत्यू झाले होते तर गेल्या 18 दिवसात तब्बल 74 लोकांचा बळी गेला आहे . कोरोनाच्या रुग्णांची संख्या देखील गेल्या 18 दिवसात दुप्पट झाली आहे . मागील 3 महिन्यात कोरोनाचे 3 हजार 326 इतके रुग्ण होते. परंतु गेल्या 18 दिवसातच तब्बल 3 हजार 96 रुग्ण सापडले आहेत . चाचण्या वाढल्या आणि चेस द व्हायरस हि मुंबईच्या धर्तीवर राबवलेल्या मोहिमे मुळे रुग्णांची संख्या वाढल्याचे पालिकेच्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितले .

 कोरोनाचा विषाणू व संसर्ग रोखायचा असेल तर मास्क घालणे , गर्दी टाळून अंतर ठेवणे आणि नाका तोंडाला हात स्वच्छ केल्या शिवाय लावू नये आदी निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने केले पाहिजे . तसेच कोरोना झालेली व त्याच्या संपर्कातील शेवटची व्यक्ती शोधून काढणे व अलगीकरण करून उपचार करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले . 

Web Title: coronavirus: Mira Bhayander has the highest incidence of coronavirus and patient recovery during 18 days of lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.