शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

Coronavirus : मेडिकलमध्ये मास्क उपलब्ध नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 2:21 AM

मास्कची रस्त्यावर सर्रास विक्री सुरू आहे. कुठे दहा रुपये, कुठे ५० रुपये, कुठे १०० रुपयाला ते विकत मिळत आहेत. अन्न व औषध प्रशासनाने मेडिकलमध्ये मास्कची चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर ते विकण्यासाठी बिल असणे आवश्यक आहे.

ठाणे : कोरोनामुळे मास्कची मागणी वाढली असली, तरी शहरातील मेडिकलमध्ये ते मिळत नसल्याचे दिसत आहे. मेडिकलमध्ये मास्क नाही; पण रस्त्यावर सर्रास विकले जात असल्याची परिस्थिती शहरात आहे. बिलाची अडचण असल्याने मेडिकलमध्ये त्यांची विक्री बंद झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने ही अडचण दूर केली तर मेडिकलमध्ये ठाणेकरांसाठी मास्क मिळतील, असे केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने सांगितले.मास्कची रस्त्यावर सर्रास विक्री सुरू आहे. कुठे दहा रुपये, कुठे ५० रुपये, कुठे १०० रुपयाला ते विकत मिळत आहेत. अन्न व औषध प्रशासनाने मेडिकलमध्ये मास्कची चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर ते विकण्यासाठी बिल असणे आवश्यक आहे. उत्पादन कंपनीकडून मास्क घेताना खरेदीचे आणि ग्राहकांना मास्क विकताना अशी दोन्ही बिले असणे आवश्यक असल्याची अट घातल्यामुळे मेडिकलमध्ये ते मिळत नसल्याचे औषधविक्रेत्यांनी सांगितले. रस्त्यावर मास्क विनाअट विकले जातात आणि मेडिकलमध्ये ते नाहीत, अशी परिस्थिती असल्याची खंत औषधविक्रेत्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. असंघटित क्षेत्रामध्ये मास्क बनविले जात आहेत, त्यांच्याकडे बिल नाही त्यामुळे आम्हाला ते मिळत नाहीत आणि केवळ याच कारणामुळे ते मेडिकलमध्ये विकले जात नाहीत. मागणी खूप असली तरी ८० टक्के मेडिकलमध्ये ते मिळत नसल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष संजय धनावडे यांनी सांगितले. पुढच्या महिन्यापासून बिलाची तरतूद केली जाईल; पण आता मागणी असल्याने ही अडचण एफडीएने दूर करावी, अशी मागणी धनावडे यांनी केली.१२ हजार मास्कची आवक थांबलीकिमान १२ हजार मास्क दररोज ठाण्यात येत होते; परंतु बुधवारपासून मास्क ठाण्यात येणे बंद झाले आहेत. आज जे उपलब्ध आहेत तेच विकले जात असल्याचे एका विक्रेत्याने (नाव न सांगण्याच्या अटीवर) सांगितले.ठाण्यामध्ये आले फॅशनेबल मास्कठाणे : कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालण्याचे आवाहन केल्यानंतर बाजारात विविध प्रकारचे मास्क दिसू लागले आहेत. यात फॅशनेबल मास्कही दिसत असून हेल्मेट मास्क, फिल्टर मास्क अशी विविध मास्कना मागणी आहे.महाराष्ट्रात कोरोनाचे सावट आल्यानंतर सॅनिटायझर आणि मास्कच्या मागणीत वाढ होऊ लागली. नेहमी पाहायला मिळणाऱ्या मास्कव्यतिरिक्त विविध आकार आणि प्रकारांचे मास्क मिळू लागले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यामध्येही विविध फॅशन आणली आहे. अगदी १० रुपयांपासून ते मिळत आहेत. ठाण्याच्या बाजारपेठेत मास्कची जागोजागी विक्री होताना दिसत आहे. नेट मास्क, हॅलोविन मास्क, प्रिंटेड मास्क, एक दिवसासाठी वापरला जाणारा मास्क, कोन मास्क तर वाहनचालकांसाठी हाफ बाइकर्स मास्क आणि हेल्मेट मास्क, लहान मुलांसाठी रंगीबेरंगी बॉर्डर असणारे मास्क बाजारात आहेत. कॉटन व होजिअरी कॉटन यामध्ये ते उपलब्ध असून खरेदीदारांमध्ये पुरुषांची संख्या अधिक असल्याचे विक्रेते अजय प्रजापती यांनी लोकमतला सांगितले.रंगीबेरंगी मास्क उपलब्धहिरव्या आणि सफेद रंगांतील मास्क प्रामुख्याने पाहायला मिळत होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कला वाढलेली मागणी पाहता या मास्कमध्ये काळा, पिवळा, खाकी, राखाडी, गडद राखी, निळा, नेव्ही ब्ल्यू, गडद निळा, चॉक्लेटी असे रंगही पाहायला मिळत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे