Coronavirus delhi bhiwandi connection 15 people travel with corona patient SSS | Coronavirus : 'त्या' 15 जणांचा एकाच ट्रेनने प्रवास, दिल्लीतील तबलिगी कार्यक्रमाचे भिवंडी कनेक्शन

Coronavirus : 'त्या' 15 जणांचा एकाच ट्रेनने प्रवास, दिल्लीतील तबलिगी कार्यक्रमाचे भिवंडी कनेक्शन

नितीन पंडीत

भिवंडी - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून राज्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनावर उपाय  म्हणून केंद्र सरकारने संपूर्ण देशभर लॉकडाऊन केले आहे. मात्र शासनाच्या निर्बंधानंतरही दिल्ली येथील तबलिगी कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विदेशी नागरिकांसह देशातील व राज्यातीलही अनेक भागातील नागरिकांचा सहभाग असल्याचे आता समोर आले आहे. त्यातच दिल्ली येथील तबलिगी कार्यक्रमात देशभरातून 6 हजारांहून अधिक नागरिक सहभागी असल्याची माहिती आता समोर येत असून त्यातील अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचेही वृत्त माध्यमांसमोर आले असल्याने या कार्यक्रमामुळे देशभर खळबळ उडाली आहे.

भिवंडीसारख्या कामगार नगरी व दाटीवाटीची वस्ती असलेल्या शहरातून देखील दिल्ली येथील तबलिगी कार्यक्रमासाठी तसेच या कार्यक्रमादरम्यान दिल्ली ट्रेन प्रवासात एकूण 15 नागरिक सहभागी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या 15 जणांपैकी 9 जणांना दिल्ली येथेच कॉरंटाईन करण्यात आले आहे तर 4 जणांना भिवंडीतील कॉरंटाईन केंद्रात हलविण्यात आले आहे. मात्र यातील 2 प्रवाशांचा अजूनही शोध लागला नसल्याची माहिती भिवंडी मनपाचे वैद्यकिय अधिकारी डॉ जयवंत धुळे यांनी दिली आहे. दरम्यान हे 2 जण अजूनही सापडले नसल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नागरिकांनी स्वतः हून शासनाकडे अथवा पोलीस प्रशासनाकडे आपली माहिती द्यावी असे आवाहन शासनाकडून वारंवार होत असूनही या दोन जणांचा अजूनही शोध लागला नसल्याने भिवंडीत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान भिवंडीत आता पर्यंत एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही, मात्र या दिल्ली प्रवासातील नागरिकांच्या संख्येमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.  दरम्यान " या 15 जणांपैकी सर्वांनीच तबलिगी कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही, मात्र काहींनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता, तर काहींनी एकाच ट्रेनमधून प्रवास केल्याने त्यांना कॉरंटाईन करण्यात आले आहे, यादरम्यान दिल्ली ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या अथवा तबलिगी कार्यक्रमात सहभागी झालेल्या दोन नागरिकांचा शोध सुरू असून याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्वरित पोलीस अथवा मनपा प्रशासनाकडे माहिती द्यावी तसेच शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचे भिवंडीकरांनी काटेकोर पालन करावे " असे आवाहन भिवंडी मनपाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांनी केले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : चिंताजनक! जगभरात तब्बल 9,36,204 कोरोनाग्रस्त; इटली, स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू

Coronavirus : 10 दिवस 'तो' कोरोनाविरोधात लढला आणि अखेर जिंकला, म्हणाला...

Coronavirus : कोरोनामुळे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्यक्तीचा मृत्यू

Coronavirus : गुरुग्राममधून आनंदाची बातमी, 10 पैकी 9 जण कोरोनामुक्त

coronavirus : पंतप्रधान मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद

 

Web Title: Coronavirus delhi bhiwandi connection 15 people travel with corona patient SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.