शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus:  मीरा भाईंदर महापालिका 417 पथकांद्वारे घरोघरी जाऊन सुरू केली एंटीजन टेस्ट किट चाचणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 13:24 IST

मीरा भाईंदर मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता झटपट कोरोना चाचणीचा अहवाल यावा यासाठी आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी मागणी केली होती .

 - धीरज परब 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी आज मंगळवार पासून  शहरात 417 पथकांद्वारे घरोघरी जाऊन लक्षणे असलेल्या नागरिकांची एंटीजन टेस्ट किट ने कोरोनाची चाचणी सुरु केली आहे . शासनाने 4 हजार किट दिले असून पालिका 1 लाख 10 हजार किट खरेदी करणार आहे . अवघ्या 15 मिनिटात कोरोना चाचणीचा अहवाल मिळणार असुन सदर सर्वेक्षण 18 जुलै पर्यंत चालणार आहे . 

मीरा भाईंदर मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता झटपट कोरोना चाचणीचा अहवाल यावा यासाठी आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांची मागणी चालली होती . त्या अनुषंगाने शासना कडून देखील 4 हजार एंटीजन टेस्ट किट महापालिका देण्यात आल्या आहेत . मंगळवारी पालिका 10 हजार किट तर येत्या काही दिवसात आणखी 1 लाख किट खरेदी करणार आहे . सदर प्रत्येक किटची किंमत 450 रुपये अधिक जीएसटी इतकी असणार आहे . 

शहरातील कोरोनाची लागण झालेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी व त्यांना अलगीकरण करण्यासाठी या टेस्टचा मोठा उपयोग होणार असल्याचे सांगितले जात आहे . महापालिकेने देखील या झटपट करून चाचणी करून घेण्यासाठी कंबर कसली आहे . 

मंगळवार 14 जुलै पासून महापालिका शहरात घरोघरी जाऊन कोरोनाची चाचणी सुरु करण्यात आली आहे . सदर किट ने कशी टेस्ट करायची या बाबत पालिकेच्या 10 आरोग्य केंद्रातील परिचारिका तसेच आशा वर्कर , पालिका कर्मचारी, शिक्षक , बालवाडी आणि अंगणवाडी शिक्षिका, स्वयंसेवक यांना प्रशिक्षण दिले गेले आहे . 10 आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण 417 तपासणी पथके तैनात केली आहेत . 

प्रत्येक पथक रोज किमान दीडशे घरां मध्ये जाऊन कोरोनाची लक्षणे असणाऱ्या लोकांची तपासणी करेल . ऑक्सिजन लेव्हल कमी असणारे , श्वास घेणास त्रास , खोकला , ताप आदी कोरोनाशी संबंधित लक्षणे दिसल्यास तपासणी केली जाईल . हे सर्वेक्षण संपूर्ण शहरात 5 दिवस चालणार असून प्रत्येक घराचे सर्वेक्षण केले जाणार आहे . या शिवाय मीरारोडच्या इंदिरा गांधी रुग्णालयात प्रसूती साठी दाखल होणाऱ्या महिला व अन्य रुग्णांची देखील तपासणी सदर किट द्वारे केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले . 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक