Coronavirus: ठाणे जिल्ह्यात आज सापजले कोरोनाचे ३०१७ नवे रुग्ण; तर ५३ रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 21:56 IST2021-05-05T21:55:01+5:302021-05-05T21:56:13+5:30
Coronavirus in Thane: ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होत असताना बुधवारी ३०१७ इतक्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात आज सापजले कोरोनाचे ३०१७ नवे रुग्ण; तर ५३ रुग्णांचा मृत्यू
ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होत असताना बुधवारी ३०१७ इतक्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ४ लाख ८० हजार १७७ रुग्णांची नोंद झाली. तर सोमवारपेक्षा मंगळवारी मृतांचा आकडा हा ११ ने वाढून दिवसभरात ५२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या ७ हजार ७८० इतकी झाली आहे.
ठाणे शहर परिसरात ५५२ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख २१ हजार ४७७ झाली आहे. शहरात ०९ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ७०७ झाली आहे. तर कल्याण - डोंबिवलीत ५६८ रुग्णांची वाढ झाली असून ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत आज २१६ रुग्णांची वाढ झाली असून १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये ७० रुग्ण सापडले असून ०२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भिवंडीत २४ बाधीत असून तिघांच्या मृत्यूची नोंद आहे. मीरा भाईंदरमध्ये २१६ रुग्ण आढळले असून ०८ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये ७५ रुग्ण आढळले आले आहे. बदलापूरमध्ये ११९ रुग्णांची नोंद झाली असून ०२ जण दगावले आहेत. ठाणे ग्रामीणमध्ये २४० नवे रुग्ण वाढले आहेत. तर ०५ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. आता बाधीत रुग्णसंख्या २७ हजार ५९४ झाली असून आतापर्यंत ७०३ मृत्यूंची नोंद आहे.