शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियम न पाळणाऱ्या आस्थापना होणार सील; आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 23:35 IST

आयुक्तांचे आदेश : कळवा प्रभाग समितीची केली पाहणी, भाजीबाजारात सकाळपासूनच कारवाई करण्याचे आदेश

ठाणे : शहरातील ज्या आस्थापना, दुकाने सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आणि मास्क वापराच्या नियमांचा भंग करतील, त्या तत्काळ सील करण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी परिमंडळ उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना दिले.

वाढत्या कोविड प्रसाराला आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून त्यांनी सोमवारी कळवा प्रभाग समितीचा दौरा केला. मात्र, मुख्य म्हणजे कळवा मार्केट, कळवा पूर्व परिसर अशा परिसरांत दौरा खऱ्या अर्थाने करणे अपेक्षित असताना अधिकाऱ्यांनी त्यांना मनीषानगर, खारेगाव, पारसिकनगर, ओझोन व्हॅली अशा स्वच्छ परिसरात फिरवून तो आटोपल्यामुळे या दौऱ्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. यामुळे तो केवळ दिखावा ठरला.

सुरुवातीला त्यांनी कळवा प्रभाग समितीच्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून कोरोनाची परिस्थिती समजून घेतली. यामध्ये योग्य पद्धतीने फवारणी आणि स्वच्छता होते की नाही तसेच झोपडपट्टी परिसरात टेस्टचे प्रमाण कमी असल्याबद्दलदेखील अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.  ही बैठक झाल्यानंतर त्यांनी थेट मनीषानगर परिसरात जाऊन पाहणी केली, त्यानंतर थेट खारेगाव आणि पारसिकनगर परिसरात जाऊन पाहणी केली. या ठिकाणी शौचालयांमध्ये स्वच्छता आहे की नाही, याचीदेखील तपासणी केली. 

मार्केटमध्ये सकाळपासूनच कारवाई करा. भाजी मार्केट हे सकाळपासूनच सुरू होत असून या ठिकाणी सकाळी लवकर भाजीविक्रेते येतात. त्यामुळे सकाळी १० नंतर कारवाई करण्यापेक्षा त्याहीपेक्षा जास्त लवकर कारवाई करण्यास सांगून हॉल, मंडप डेकोरेटर यांच्यावरदेखील कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे