शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

रुग्णालयाला जागा देण्यावरून पडली वादाची ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 23:52 IST

Ambernath News : गेली अनेक वर्षे ही जागा स्थानिकांनी संरक्षित ठेवली आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाची जागा सोडून रुग्णालय उभारण्याची मागणी जोर धरत आहे.

अंबरनाथ - सूर्योदय सोसायटीमधील मोकळ्या राखीव भूखंडावर सरकारी रुग्णालय बांधण्याचे प्रयत्न सरकार दरबारी सुरू आहेत. रुग्णालयाला विरोध नाही मात्र गेल्या अनेक वर्षांचा त्या ठिकाणचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम झाले नाही, तर रुग्णालयाला नागरिकांचा विरोध कायम राहील. प्रसंगी जनआंदोलनाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. गेली अनेक वर्षे ही जागा स्थानिकांनी संरक्षित ठेवली आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाची जागा सोडून रुग्णालय उभारण्याची मागणी जोर धरत आहे.कोरोनाच्या काळात रुग्णालयांची कमतरता जाणवू लागल्याने अंबरनाथच्या पूर्व भागातील सूर्योदय सोसायटीचा ११२ हा राखीव भूखंड रुग्णालय बांधण्यासाठी नगरपालिकेला ताबडतोब हस्तांतरित करण्याबाबत तहसीलदारांनी सोसायटीला सांगितले. सरकारच्या निर्णयानंतर कानसई विभागातील नागरिकांची नुकतीच बैठक झाली. माजी नगरसेवक कुणाल भोईर, माजी नगरसेविका अपर्णा भोईर, विजय इंगळे, जगदीश हडप, एकनाथ चौधरी, गिरीश सोमणी, कानसई गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष भागवत खैरनार आदी उपस्थित होते. मैदान बचाव संघर्ष समितीची या बैठकीत स्थापना करण्यात आली.कानसई येथील राखीव मोकळ्या भूखंडावर सुमारे ५२ वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेशोत्सवात अरुण नलावडे, अविनाश खर्शीकर, भाऊ कदम आदी दिग्गज कलावंतांसह शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. अमोल कोल्हे यांची या मैदानात व्याख्याने झाली आहेत. याशिवाय रणजीपटू वसंत धानिपकर यांनी विनामूल्य प्रशिक्षण दिले. त्याचबरोबर मैदानात क्रिकेटच्या अनेक स्पर्धाही झाल्या. गेल्या काही वर्षांपासून नवरात्रौत्सव याच मैदानात जल्लोषात साजरा होत आहे. 

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणारी कानसईची टेकडी स्थानिक नागरिकांची जान आणि शान आहे. अनेक कलावंतांनी कलेला याच मैदानातून सुरुवात केली. रुग्णालयाला विरोध नाही, ते अन्यत्र करावे. मात्र मैदान निर्माण करणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे सरकारने त्याची दखल घ्यावी.- विशाखा सुभेदार, अभिनेत्री

मुलांना खेळण्यासाठी आणि सांस्कृतिक कला सादर करण्यासाठी स्थानिक कलाकारांना व्यासपीठ असावे. या मुद्यावर व्यापक विचार करण्याची गरज आहे. वाद टाळून निर्णयाचा फेरविचार व्हावा.             - निरंजन कुलकर्णी, अभिनेता 

रुग्णालये होणे ही काळाची गरज आहे, त्याचबरोबर मैदाने टिकली पाहिजेत, सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. कानसई मैदानाविषयी नागरिकांचे अतूट नाते आहे. स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना मैदानात वाव मिळाला आहे. यापुढेही मैदान तसेच राहावे. उर्वरित जागेत रुग्णालय व्हावे.                         - कुणाल भोईर, माजी नगरसेवक

टॅग्स :hospitalहॉस्पिटलambernathअंबरनाथ