वादग्रस्त सहायक आयुक्त सचिन बोरसे यांची अखेर बदली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:03 IST2025-10-18T11:02:30+5:302025-10-18T11:03:42+5:30
उद्धवसेना आणि मनसेने सोमवारी ठाणे पालिकेतील भ्रष्टाचार, वाहतूककोंडी, कचरा, पाणी समस्या, रस्त्यांवरील खड्डे आदींसह इतर मुद्दे घेऊन पालिकेवर मोर्चा काढला होता. या मोर्चात शरद पवार गट आणि काँग्रेसही सहभागी झाले होते.

वादग्रस्त सहायक आयुक्त सचिन बोरसे यांची अखेर बदली
ठाणे : विविध मागण्यांसाठी महाविकास विकास आघाडीने नुकताच मोर्चा काढला होता. या मागण्यांपैकी एक म्हणजे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी निवडणूक विभागात कार्यरत असलेले वादग्रस्त सहायक आयुक्त सचिन बोरसे यांची केलेली बदली. त्यांच्याकडे आता परवाना, जनगणना आणि नागरी सुविधा केंद्राची जबाबदारी देण्यात आली आहे, तर बाळू पिचड यांच्याकडे निवडणूक विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे.
उद्धवसेना आणि मनसेने सोमवारी ठाणे पालिकेतील भ्रष्टाचार, वाहतूककोंडी, कचरा, पाणी समस्या, रस्त्यांवरील खड्डे आदींसह इतर मुद्दे घेऊन पालिकेवर मोर्चा काढला होता. या मोर्चात शरद पवार गट आणि काँग्रेसही सहभागी झाले होते. यानिमित्ताने महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आयुक्त राव यांची भेट घेऊन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. बोरसे यांच्याकडे निवडणूक आणि परवाना विभाग होता. त्यातील निवडणूक विभाग त्यांच्याकडून काढण्यात आला असून त्याचा पदभार कार्यालयीन अधीक्षक बाळू पिचड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच उथळसर प्रभाग समितीचा देखील पदभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. तर बोरसे यांच्याकडे परवाना विभाग कायम आहे.
मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जी मागणी केली होती ती अखेर पूर्ण झालेली आहे.
रवी मोरे, शहराध्यक्ष, मनसे, ठाणे