महागाई विरोधात ठाण्यात काॅग्रेसची जनआंदोलन सायकल रॅली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 17:00 IST2021-07-10T16:57:15+5:302021-07-10T17:00:38+5:30
राज्यातील पेट्रोल, डीझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाई विरोधात ठाणे शहर काँग्रेसने शहरात केंद्र शासनाच्या निषेधार्थ सायकल रँली काढून शनिवारी जनआंदोलन छेडले.

महागाई विरोधात ठाण्यात काॅग्रेसची जनआंदोलन सायकल रॅली
ठाणे : राज्यातील पेट्रोल, डीझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाई विरोधात ठाणे शहर काँग्रेसने शहरात केंद्र शासनाच्या निषेधार्थ सायकल रँली काढून शनिवारी जनआंदोलन छेडले. यावेळी कार्यकर्त्यांनी चौकाचौकात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. (Congress's Jan Andolan Cycle Rally in Thane against inflation)
शहरभर काढलेली ही सायकल रॅली साईकृपा हॉटेल, राम मारूती रोड, समर्थ भांडार नौपाडा, गावदेवी मार्केट, एम.एच.हायस्कूल, तलावपाली, टेभ्बी नाका येथून काढली. या रँलीचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर समारोप झाला. यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष अँड. विक्रांत चव्हाण, यांनी केंद्रातील सरकार महागाईला जबाबदार असल्याचा आरोप करून या पुढेही या सरकार विरोधात विविध स्वरूपात आंदोलन सुरु ठेवण्याचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना केले.