शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रात काँग्रेस पक्षाला पडले खिंडार

By admin | Updated: November 16, 2016 04:30 IST

काही दिवसांपासून थांबलेले इनकमिंग, आऊटगोर्इंगने आता पुन्हा एकदा वेग पकडला असून नोटा बंदीमुळे लांबलेले पक्षप्रवेशही

ठाणे : काही दिवसांपासून थांबलेले इनकमिंग, आऊटगोर्इंगने आता पुन्हा एकदा वेग पकडला असून नोटा बंदीमुळे लांबलेले पक्षप्रवेशही आता सुरु झाले आहेत. विशेष म्हणजे यात काँग्रेसला ठाण्यात आणखी एक जबर धक्का बसला असून पक्षाचे गटनेते राजन किणे त्यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका अनिता किणे, रेश्मा पाटील, माजी नगरसेविका सुनिता सातपुते आणि मुंब्य्राचे पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष रमेश पाटील, मोरेश्वर किणे यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला हा मुंब्य्रातील सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.काही दिवसांपासून काँग्रेसमधील बंद असलेली गळती पुन्हा एकदा सुरु झाली आहे. ठाण्यातील काँग्रेसचे नगरसेवकांना शिवसेना आणि भाजपाने आपल्या जाळ्यात ओढल्यानंतर आता कळवा, मुंब्य्रात राष्ट्रवादीने आपली ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मुंब्य्रातील काँग्रेसच्या सहापैकी उपरोक्त तीन नगरसेवकांना राष्ट्रवादीने आपल्या पक्षात आणले आहे. यावेळी कळवा, मुंब्य्राचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शहर अध्यक्ष आनंद परांजपे, नजीब मुल्ला, स्थानिक नगरसेवक शानू पठाण आदी उपस्थित होते. एकीकडे ठाण्याच्या भागात शिवसेना आणि भाजपा आपली ताकद वाढविण्यासाठी व्युव्हरचना आखत असतांना दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आपला बालेकिल्ला आणखी मजबुत करण्यासाठी काँग्रेसचे नगरसेवकांना आपल्या पक्षात सामील करुन घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार पहिल्या टप्यात हे तीन नगरसेवक घेतल्यानंतर पुढील टप्यात आणखी बडे मासे पक्षात येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. परंतु, दुसरीकडे काँग्रेसची भिस्त देखील ही मुंब्य्रावर अधिक अवलंबून होती, आधीच शहरात पक्षाला फटका बसलेला आहे. आता तर मुंब्य्रात राष्ट्रवादीने त्या पक्षाला खिंडारच पाडले आहे. (प्रतिनिधी)