शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली

By admin | Updated: November 15, 2016 04:39 IST

घराच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘बिल्वदल’वासीयांनी गुरुवारपासून छेडलेले बेमुदत उपोषण अविरतपणे सुरूच आहे. सोमवारी उपोषणकर्त्यांपैकी तीन

डोंबिवली : घराच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘बिल्वदल’वासीयांनी गुरुवारपासून छेडलेले बेमुदत उपोषण अविरतपणे सुरूच आहे. सोमवारी उपोषणकर्त्यांपैकी तीन महिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारार्थ केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात एक ७५ वर्षांची वृद्धाही आहे. केडीएमसी आयुक्त ई. रवींद्रन यांनी उपोषणाची दखल न घेतल्याने रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, रहिवासी उपोषण सोडत नसल्याने पोलीस यंत्रणेची पुरती दमछाक झाली आहे. केडीएमसी आणि इमारतमालकाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ पूर्वेकडील इंदिरानगर चौकात बिल्वदल इमारतीतील रहिवाशांनी बेमुदत उपोषण छेडले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांनी शनिवारी सूतिकागृह व शास्त्रीनगर रुग्णालयाचा दौरा करून तेथील दुरवस्थेची पाहणी केली. त्या वेळी त्यांच्यासोबत आयुक्त ई. रवींद्रन आणि अतिरिक्त आयुक्त संजय घरत हेदेखील उपस्थित होते. या दौऱ्यानंतर खासदार आणि महापौरांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी रवींद्रनदेखील भेट देतील, अशी अपेक्षा उपोषणकर्त्यांना होती. परंतु, ते न फिरकल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दरम्यान, चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे सोमवारी सकाळी कस्तुरी चौधरी (वय ७५), वंदना चौधरी आणि गुणावती जतन यांची प्रकृती बिघडली. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने अखेर महापालिकेच्या रुग्णवाहिकेतून त्यांना शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. (प्रतिनिधी)