म्हाडाची प्रकल्प वेळेत  पूर्ण करा अन्यथा बिल्डरांना दंड लावा - मुख्यमंत्री शिंदे

By अजित मांडके | Published: February 24, 2024 12:43 PM2024-02-24T12:43:29+5:302024-02-24T12:43:49+5:30

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या ३० हजार लोकांना घरे देण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्र्वासित केले.

Complete the Mhada project on time or else fine the builders - Chief Minister Eknath Shinde | म्हाडाची प्रकल्प वेळेत  पूर्ण करा अन्यथा बिल्डरांना दंड लावा - मुख्यमंत्री शिंदे

म्हाडाची प्रकल्प वेळेत  पूर्ण करा अन्यथा बिल्डरांना दंड लावा - मुख्यमंत्री शिंदे

ठाणे : म्हाडाने वेळेत गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून घ्यायला हवेत, अन्यथा प्रकल्प रेंगाळून पुन्हा त्यांची दुरुस्ती करण्याची वेळ येते. जे बिल्डर्स वेळेत प्रकल्प पूर्ण करतील, त्यांना बक्षीस द्यावे आणि जे मर्यादित वेळेत पूर्ण करणार नाहीत, त्या बिल्डरला दंड लावण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील कोकण म्हाडाच्या लॉटरी समारंभात दिले.

कोकण म्हाडाच्या ५३११ घरांची लॉटरी आज ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या समारंभात काढण्यात आली. त्यावेळी विजेत्यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी गृह प्रकल्पांना होणाऱ्या विलंबाबाबत  चिंता व्यक्त केली. गुणवत्तापूर्ण घरे वाढताना ती वेळेत पूर्ण करण्याची गरज व्यक्त करीत शेवटच्या घटका पर्यंत फायदा पोहचण्यासाठी नियम सुट सुटीत करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी देऊन म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या ३० हजार लोकांना घरे देण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्र्वासित केले.
यावेळी गृहनिर्माण मंत्री अनिल सावे, संजीव जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Complete the Mhada project on time or else fine the builders - Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.