सुपर स्पेशालिटीसाठी ‘सिव्हील’चे जूनपर्यंत स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 03:08 AM2019-01-08T03:08:31+5:302019-01-08T03:08:45+5:30

नियोजित समितीत चर्चा : जिल्हा शल्यचिकित्सकांचे स्पष्टीकरण

'Civil' migration till June for super specialty | सुपर स्पेशालिटीसाठी ‘सिव्हील’चे जूनपर्यंत स्थलांतर

सुपर स्पेशालिटीसाठी ‘सिव्हील’चे जूनपर्यंत स्थलांतर

Next

ठाणे : येथील सिव्हील रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होणार आहे. त्यासाठी या रुग्णालयाच्या दोन्ही इमारती पाडण्यात येणार आहेत. तत्पूर्वी या रुग्णालय अन्यत्र स्थलांतरित करण्याची अपेक्षा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत व्यक्त केली.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार संजय केळकर यांनी या रुग्णालयाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास अनुसरून पालकमंत्र्यांनी या रुग्णालयाचे लवकरच स्थलांतर करून काम सुरू करण्यासाठी मंजुरीदेखील मिळवल्याचे सांगितले.
सिव्हील रुग्णालयाचे तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी सुमारे चार ठिकाणांची यादी या बैठकीत चर्चेला आली. यामध्ये मनोरुग्णालयासह मुंब्रा-कौसा येथील महापालिकेची इमारत, माजिवडा, कशीश पार्क आदी ठिकाणी इमारती उपलब्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. पण, रुग्णाच्या सोयीनुसार या इमारतीत रुग्णालय सुरू करणे शक्य नसल्याचा सूरदेखील यावेळी ऐकायला मिळाला.
वागळे इस्टेटमधील कामगार रुग्णालयाच्या इमारतीमध्ये सिव्हील रुग्णालय शिफ्ट करण्याचे आधी ठरले होते. मात्र, रुग्णांच्या सोयीनुसार ती जागा अयोग्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील गोरगरिबांचे या सिव्हील रु ग्णालयाकडे पाहिले जाते. पण, या रुग्णालयाच्या मुख्य इमारतीसह त्याच्याशेजारील इमारत धोकादायक स्थितीत असल्यामुळे त्या वेळीच पाडाव्या लागणार असल्याचा मुद्दा जिल्हा नियोजन समितीमध्ये यावेळीही चर्चेला आला. रुग्णालय इमारतींच्या विविध विभागांतील प्लास्टर व स्लॅब निखळल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

निसर्ग हॉस्टेल, मनोरुग्णालयात होणार स्थलांतर
च्रु ग्णालयाचे निर्लेखन करून नवीन इमारत उभारणी न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत येणार नसल्याचा मुद्दाही यावेळी चर्चेला आला.

च्त्यामुळे जूनपर्यंत या रुग्णालयाचे स्थलांतर अन्य ठिकाणी करण्याच्या दृष्टीने महापालिकांच्या इमारतींची पाहणी सुरू केल्याचे या रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार सभागृहात स्पष्ट केले.

च्या रुग्णालयाच्या धोकादायक इमारतीतील काही विभाग रुग्णालयासमोरील निसर्ग हॉस्टेलमध्ये तर, काही विभाग जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आवारातील ट्रेनिंग सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. पवार यांनी यावेळी दिली.

Web Title: 'Civil' migration till June for super specialty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.