चीनमध्ये बनावट भारतीय नोटा बनवणाऱ्याला अटक; साठ हजारांच्या बनावट नोटा हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 05:34 AM2019-09-07T05:34:00+5:302019-09-07T05:34:04+5:30

काही रुपयांच्या बदल्यात बनावट नोटा विक्रीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अनिल सुरवसे यांना मिळाली

Chinese Indian cash maker arrested in China; Seized thousands of counterfeit notes | चीनमध्ये बनावट भारतीय नोटा बनवणाऱ्याला अटक; साठ हजारांच्या बनावट नोटा हस्तगत

चीनमध्ये बनावट भारतीय नोटा बनवणाऱ्याला अटक; साठ हजारांच्या बनावट नोटा हस्तगत

Next

ठाणे : चीनमध्ये ग्राफीक डिझाइनिंगचे प्रशिक्षण घेऊन भारतीय चलनातील बनावट नोटा बनविणाºया मारी काशी मणी याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचच्या पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्याच्या अन्य एका साथीदाराला यापूर्वीच अटक करून त्यांच्याकडून ६० हजारांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत.

काही रुपयांच्या बदल्यात बनावट नोटा विक्रीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अनिल सुरवसे यांना मिळाली होती. त्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या पथकाने २९ आॅगस्ट रोजी कोपरी येथील आनंद सिनेमागृह भागात सापळा रचून अब्बलगन मुर्तुवर (२८, रा. धारावी, मुंबई) याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून १०० रुपये दर्शनी मूल्याच्या ६०० वेगवेगळ्या अनुक्रमांकाच्या ६० हजारांच्या बनावट नोटाही हस्तगत केल्या होत्या. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.

पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत या बनावट नोटा त्याचा साथीदार मुंबईच्या पोईसर भागातील रहिवाशी मणी याच्या मदतीने छापल्याचे कबूल केले. त्यानुसार ३१ आॅगस्ट २०१९ रोजी त्यालाही अटक केली. त्यांच्याकडून नोटा छपाईसाठी लागणारे साहित्य हस्तगत केले. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला आणि पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली युनिट पाचच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Chinese Indian cash maker arrested in China; Seized thousands of counterfeit notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.