शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

मेट्रो-९ च्या मार्गात बदल, नवघर-इंद्रलोक वगळले, लोकांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 5:17 AM

पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन : नवघर-इंद्रलोक वगळले, लोकांमध्ये नाराजी

मीरा रोड : पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या दहिसर पूर्व ते भार्इंदर पश्चिम या मेट्रो-९ प्रकल्पातून भार्इंदर पूर्वच्या सावरकर चौकातून नवघर-इंद्रलोकपर्यंत जाणारा मार्ग रद्द केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे न्यू गोल्डन नेस्ट, इंद्रलोक, गोडदेव आणि नवघर गावातील लोकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. याशिवाय, स्थानकांना महापुरु षांची नावे देण्याच्या प्रकारास फाटा देऊन एमएमआरडीएने स्थानिक परिसरानुसार स्थानकांची नावे ठरवली आहेत.

आधी अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व या मेट्रो-७ प्रकल्पाचा विस्तार करून मीरा-भार्इंदरपर्यंत मेट्रो आणण्याचे दावे केले जात होते. डिसेंबर २०१७ पर्यंत या प्रकल्पाचे कामही सुरू होणार असल्याची घोषणा पालिका निवडणुकीत केली होती. परंतु, एमएमआरडीएच्या २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात मीरा-भार्इंदर मेट्रोसाठी तरतूदच नसल्याचे लोकमतने उघड केल्यावर राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली. या मुद्यावर सत्ताधारी भाजपावर शिवसेना, काँग्रेसने टीकेची झोड उठवली. सेनेने तर मेट्रोचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. अखेर, मंत्रिमंडळ बैठकीत मेट्रोला मान्यता देऊन कामाची निविदा प्रक्रि या सुरू करण्यात आली. तत्पूर्वी, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एमएमआरडीएनेच पालिकेला पत्र देऊन नऊ मेट्रो स्थानकांच्या नावांची माहिती दिली होती. त्यामध्ये पांडुरंगवाडी, अमर पॅलेस, झंकार कंपनी, साईबाबानगर, दीपक हॉस्पिटल, पालिका क्र ीडासंकुल, इंद्रलोक, शहीद भगतसिंग उद्यान आणि नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियम आदी स्थानकांचा समावेश होता. त्यावेळी सत्ताधारी भाजपाने महासभेत पांडुरंगवाडीऐवजी पेणकरपाडा, अमर पॅलेसऐवजी मीरागाव, झंकार कंपनीऐवजी छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबानगरऐवजी सरदार वल्लभभाई पटेल, दीपक रु ग्णालयाऐवजी नानासाहेब धर्माधिकारी, पालिका क्र ीडासंकुलाऐवजी महाराणा प्रताप, इंद्रलोकऐवजी नवघर, शहीद भगतसिंगऐवजी महावीर स्वामी, तर सुभाषचंद्र बोसऐवजी बालयोगी सदानंद महाराज अशी नावे बदलण्याचा ठराव केला होता. शिवसेना, काँग्रेसच्या नगरसेवकांनी क्र ीडासंकुलास गोडदेव, साईबाबानगरला ब्रह्मदेव मंदिर तसेच शहीद भगतसिंग यांचेही नाव स्थानकास देण्याची मागणी केली होती. गोडदेव नावाच्या मागणीसाठी स्थानिकांनीही आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.एमएमआरडीएने भूमिपूजनानिमित्त केलेल्या जाहिरातींमध्ये पांडुरंगवाडी, मीरागाव, काशिगाव, साईबाबानगर, मेडतियानगर, शहीद भगतसिंग गार्डन व सुभाषचंद्र बोस स्टेडियम अशी स्थानकांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी महापुरु षांची नावे स्थानकांना देण्याच्या राजकारणाला मुख्यमंत्र्यांच्या एमएमआरडीएनेच कात्री लावली आहे.मेडतियानगर या प्रस्तावित मेट्रो स्थानकाच्या नावावरही लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण, येथे अजून या नावाचे प्रसिद्ध असे नगर वा वसाहतच अस्तित्वात नाही.प्रत्यक्षात कामाला सुरुवात कधी?च्भार्इंदरच्या सावरकर चौकातून इंद्रलोक-नवघरकडे न वळता भार्इंदर पश्चिमेला भगतसिंग उद्यान व बोस स्टेडियमकडे सरळ जाणार असल्याने भार्इंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट, इंद्रलोक, गोडदेव, नवघर भागातील लोकांमध्ये नाराजी आहे.च्येथील मुख्य चौकास स्वातंत्र्यवीर सावरकर चौक नाव असल्याने मेडतियानगरऐवजी सावरकर यांचेच नाव सयुक्तिक ठरले असते, असे लोकांचे म्हणणे आहे. मेट्रोचे भूमिपूजन झाले असले, तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात कधी होणार, असे विचारले जात आहे.

टॅग्स :Metroमेट्रोthaneठाणे