भिवंडीतील हत्ते प्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल ; पाच जण ताब्यात

By नितीन पंडित | Published: April 3, 2024 04:53 PM2024-04-03T16:53:00+5:302024-04-03T16:53:32+5:30

जखमींवर शहरातील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Case registered against 10 people in Bhiwandi rape case; Five people in custody | भिवंडीतील हत्ते प्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल ; पाच जण ताब्यात

भिवंडीतील हत्ते प्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल ; पाच जण ताब्यात

भिवंडी: शहरातील शांतीनगर परिसरातील के जी एन चौक या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी पूर्ववैमनस्यातून दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सह जण जखमी झाले आहेत.याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        क्रिकेट खेळण्याच्या वादातून नोव्हेंबर मध्ये दोन गटात हाणामारी होऊन गुन्हा दाखल झाला होता.त्याचा राग मनात ठेवून आरिफ खान त्याचा भाऊ आबिद, बुलाल,फरदिन,सादिक,शकिल शेख, समिर शेख,इदु शेख,जिशान शेख, साळीवाला व इतर अनोळखी तीन ते चार जण यांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवला.या हल्ल्यात सात जण जखमी झाले असून त्यापैकी जुबेर शोएब शेख याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे.

     जखमींवर शहरातील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या पैकी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून चौकशी सुरु असल्याची माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.
 

Web Title: Case registered against 10 people in Bhiwandi rape case; Five people in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.