शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

आएएएस अधिकाऱ्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 06:33 IST

‘टीएमटी’तील सात कोटी रुपयांचा घोटाळा 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सात कोटी रुपयांच्या घाेटाळ्याप्रकरणी ठाण्यात आयएएस अधिकाऱ्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) ४७० प्रवासी बसथांब्यांच्या जागी बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर प्रवासी निवारे बांधून त्यावर जाहिरात प्रदर्शित करण्याच्या ठेका देण्यात आला होता.

यात सहा कोटी ७३ लाख ५५ हजार ९४६ रुपयांचा घोटाळा झाल्याप्रकरणी तत्कालीन परिवहन व्यवस्थापक व विद्यमान सनदी अधिकारी अशोक करंजकर यांच्यासह १० जणांविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आगार व्यवस्थापक दिलीप कानडे, निवृत्त परिवहन व्यवस्थापक श्रीकांत सरमोकदम, निवृत्त परिवहन उपव्यवस्थापक कमलाकर दीक्षित, तत्कालीन मुख्य लेखापाल अजित निऱ्हाळे (निवृत्त), परिवहनमधून बडतर्फ झालेले तत्कालीन वाहतूक अधीक्षक गुरुकुमार पेडणेकर, तत्कालीन लेखापरीक्षक (निवृत्त) पिटर पिंटो आणि सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत धुमाळ आदी आठ अधिकाऱ्यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. सनदी अधिकारी असलेले करंजकर हे सध्या कृषी उद्योग महामंडळामध्ये व्यवस्थापकीय संचालक आहेत, तर सोल्युशन्स अ‍ॅडव्हर्टायझिंगचे  प्रवीण सोलंकी आणि गुज्जू अ‍ॅड्सचे व्यवस्थापकीय संचालक भावेश भिडे या दोन खासगी व्यक्तींचाही यात समावेश आहे.

करंजकर यांच्यासह आठ अधिकाऱ्यांनी २००८ ते २०१८ या काळात आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केला. सोलंकी आणि भिडे या दोघांसह इतरांच्या मदतीने त्यांनी टीएमटीच्या ४७० बस प्रवासी निवाऱ्यांच्या मूळ जागी बीओटी तत्त्वावर निवारे बांधून त्यावर जाहिरात प्रदर्शनाचे हक्क देण्याबाबतचा ठेका मिळण्यासाठी टीएमटीनेघेतलेल्या निविदा प्रक्रियेत जॉइंट व्हेंचरची तरतूद नसतानाही सोल्युशन अ‍ॅडव्हर्टायझिंग यांनी विश्वर पब्लिसिटी, झेनिथ आउटडोअर आणि गुज्जू अ‍ॅड. प्रा. लि. या कंपन्यांचा बनावट डीड तयार केला. याच कंपनीची तीन वर्षांच्या नफा-तोटा आणि ताळेबंदीबाबतची अपूर्ण कागदपत्रे जोडली. तरीही ‘सोल्युशन’ यांना बेकायदा ठेका मिळवून दिला. अशा प्रकारे गैरव्यवहार करून ‘सोल्युशन’ला ठेका मिळाल्यानंतर १० लाखांची इसारा रक्कम बेकायदा परत केली. अशाच वेगवेगळ्या प्रकारे सहा कोटी ७३ लाख ५५ हजारांचे टीएमटीचे आर्थिक नुकसान केल्याने ठाणे एसीबीने १ मार्चला अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका