शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदी नव्या पर्वाची सुरुवात

By admin | Updated: November 14, 2016 04:15 IST

देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या २५ टक्के काळी अर्थव्यवस्था आहे. एकूण नोटांपैकी १५ टक्के नोटा खोट्या आहेत. काळी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली

ठाणे : देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या २५ टक्के काळी अर्थव्यवस्था आहे. एकूण नोटांपैकी १५ टक्के नोटा खोट्या आहेत. काळी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आणि खोट्या नोटा हद्दपार झाल्यावर येत्या काळात लोकांनी मोठ्या नोटांचा वापर टाळून ई-व्यवहार वाढवावे. परिणामी, व्यवहार अधिकाधिक सुसह्य आणि पारदर्शी होतील, हाच नोटा रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामागील हेतू आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. अभिजित फडणीस यांनी केले. सध्या सुट्या पैशांची चणचण जाणवत असली तरी लोकांनी आपले पैसे धोक्यात आहेत, असे समजू नये. गोंधळून जाऊ नये. ही नव्या पर्वाची सुरुवात आहे, असेही ते म्हणाले.‘विचार व्यासपीठ’च्या वतीने ‘आर्थिक सर्जिकल स्ट्राइक’ या विषयावर सहयोग मंदिर सभागृहात डॉ. फडणीस यांचे व्याख्यान आयोजित केले होते. ते म्हणाले की, ५०० आणि हजाराची नोट बंद करण्याचा निर्णय झाल्यावर गेल्या चार दिवसांत सर्वाधिक फरफट सर्वसामान्य माणसांची झाली आहे. सर्वसामान्य माणसांच्या आणि बँक कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेला नमस्कार करावा लागेल. परंतु, त्रासाचा हा टप्पा थोड्या दिवसांचा आहे. या काळात आपण सर्व व्यवहार रोखीने करण्याची गरज नाही. आपल्या घरात रोख रक्कम असावी, ही सर्वसामान्य माणसाची मानसिकता योग्य नाही. अधिकाधिक लोकांनी ई-व्यवहार करावे. ज्येष्ठाांनीही तरुणांकडून मोबाइल, कॉम्प्युटरच्या माध्यमातून घरबसल्या कसे व्यवहार करायचे, हे शिकून घ्यावे. अर्थसाक्षरता वाढवण्याची गरज आहे, असेही फडणीस म्हणाले. कष्टाचे पैसे असलेल्यांनी चढ्या दराने सोने विकत घेऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.सध्या आपल्या अर्थव्यवस्थेची वाटचाल दमदार आहे. या निर्णयामुळे अधिकाधिक लोक कर भरतील. त्यामुळे कराचे दरही कमी होतील. काळ्या पैशांमुळे वस्तूचे वाढलेले दर कमी होऊन स्वस्ताई येईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. या वेळी व्यासपीठावर संजीव ब्रह्मे, मकरंद मुळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)