घोडबंदर रोडवर कार झाडाला आदळल्याने झाला चक्काचूर, एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 22:26 IST2020-06-13T22:24:50+5:302020-06-13T22:26:22+5:30
कारचा चक्काचूर झाला असुन घटनास्थळी मदयाच्या बाटल्या आढळल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

घोडबंदर रोडवर कार झाडाला आदळल्याने झाला चक्काचूर, एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर
ठळक मुद्देघडली.घोडबंदर रोडवरून ठाण्याच्या दिशेने येत असताना कापुरबावडीनजीक विहंग हॉटेलजवळ ही दुर्घटना घडली.शनिवारी रात्री ठाण्यातील घोडबंदर रोडवर घडली.
ठाणे -नियंत्रण सुटल्याने भरधाव फॉर्चुनर कार झाडाला धडकुन झालेल्या भीषण अपघातात कारमधील एकजण ठार तर,चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री ठाण्यातील घोडबंदर रोडवर घडली.
घोडबंदर रोडवरून ठाण्याच्या दिशेने येत असताना कापुरबावडीनजीक विहंग हॉटेलजवळ ही दुर्घटना घडली.घटनास्थळी कापुरबावडी पोलीस, ठाणे मनपा अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथकाने धाव घेत जखमींना सरकारी तसेच,खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.अशी माहिती कापुरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल देशमुख यांनी दिली.हा अपघात इतका भीषण होता की,कारचा चक्काचूर झाला असून घटनास्थळी मदयाच्या बाटल्या आढळल्याची माहिती स्थानिकांनी दिली.