टिटवाळ्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:40 IST2021-07-29T04:40:23+5:302021-07-29T04:40:23+5:30

टिटवाळा : पूर्वेतील बल्याणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मधुबन सोसायटीच्या परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. टेम्पोचालक अक्षय ...

The body of a stranger in Titwala | टिटवाळ्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

टिटवाळ्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

टिटवाळा : पूर्वेतील बल्याणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मधुबन सोसायटीच्या परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. टेम्पोचालक अक्षय आलाट (रा. गणेशनगर) हे मंगळवारी (दि. २७) रात्री घरी जात असताना सिद्धिविनायक दुकानासमोर त्यांना एक अनोळखी व्यक्ती झोपलेली दिसली. ती व्यक्ती हालचाल करीत नसल्याने आलाट यांनी जवळ जाऊन पाहिले. आवाज देऊनही तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी या घटनेबाबत कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याला माहिती दिली. या पुरुषाचे वय अंदाजे ४५ वर्षे असून, तो चेंबूर, मुंबई येथील रहिवासी आहे. त्याच्या अंगावर राखाडी-पिवळसर रंगाचा शर्ट असून, त्यावर चौकटी डिझाइन आहे. निळ्या रंगाची फुलपँट असून, त्याची ओळख पटण्यासाठी टिटवाळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

---------------

Web Title: The body of a stranger in Titwala