कल्याणमध्ये भाजपचे धरणे आंदोलन; तहसीलदारांना दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:39 AM2020-02-26T00:39:31+5:302020-02-26T00:39:35+5:30

अत्याचार, शेतकरी कर्जमाफीविरोधात निदर्शने

BJP's dharna agitation in Kalyan; Statement to the Tahsildar | कल्याणमध्ये भाजपचे धरणे आंदोलन; तहसीलदारांना दिले निवेदन

कल्याणमध्ये भाजपचे धरणे आंदोलन; तहसीलदारांना दिले निवेदन

googlenewsNext

डोंबिवली : शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि महिलांवरील अत्याचाराविरोधात मंगळवारी कल्याण जिल्हा भाजपतर्फे कल्याण तहसील कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारविरोधात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, हेक्टरी २५ हजार रुपये मिळावेत तसेच राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार थांबले पाहिजेत, हिंगणघाट घटनेतील पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, आदी मुद्द्यांवर हे धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, खा. कपिल पाटील, प्रदेश सचिव नरेंद्र पवार, विरोधी पक्षनेते राहुल दामले, स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, गटनेते शैलेश धात्रक, महिला आघाडीच्या डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्षा पूनम पाटील, पश्चिम मंडल अध्यक्षा रेखा म्हात्रे, कल्याणच्या पुष्पारत्न पारखी तसेच नगरसेवक, नगरसेविका पदाधिकारी आदी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

स्वाक्षरी अभियानाला प्रतिसाद : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यास अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात सोमवारी भाजपच्या महिला मोर्चाने स्वाक्षरी मोहीम राबवली. अप्पा दातार चौक, भाजप पूर्व मंडल कार्यालय, रेल्वे स्थानकासमोर आदी ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली. महिलांनी यावेळी स्वाक्षरी केली. यावेळी भाजप डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी, महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा उज्ज्वला दुसाने, नगरसेवक राजन सामंत, मुकुंद पेडणेकर, संदीप पुराणिक, राजन आबाळे, निलेश म्हात्रे, संजीव बीडवाडकर आदी उपस्थित होते.

Web Title: BJP's dharna agitation in Kalyan; Statement to the Tahsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.