शहरं
Join us  
Trending Stories
1
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
2
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
3
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
4
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
5
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
6
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
7
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
8
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
9
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
10
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
11
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
12
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
13
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
14
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
15
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
16
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
17
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
18
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
19
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
20
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा

महाराष्ट्र, बिहार राज्यातून भाजपा हद्दपार होणार - विजय वडेट्टीवार

By अजित मांडके | Published: March 15, 2024 2:19 PM

पक्ष फोडून नेते पळून ज्यांनी या राज्याच्या अस्मितेला डाग लावला त्यांच्या उरात या यात्रेने धडकी भरली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ठाणे : महाराष्ट्र, बिहार या राज्यातून भाजप हद्दपार होणार असून कर्नाटक ही त्यांच्याकडे राहणार नसल्याचे भाकीत काँग्रेस पक्षाचे नेते व विधान सभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी ठाण्यात बोलताना वर्तवले आहे. तर अब की बार ४०० पार म्हणणारे भाजप सरकार आले तर डिझेल आणि पेट्रोलचे दर हे निश्चित ४० पार होतील अशी टीका ही त्यांनी यावेळी केली. याशिवाय महाराष्ट्रातच नाही तर देशात ही चित्र बदलत असल्याचेही त्यांनी यावेळी प्रामुख्याने सांगितले.

शनिवारी १६ मार्च रोजी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाणे शहरातून मुंबईकडे रवाना होणार आहे. या यात्रेनिमित्त ही यात्रा यशस्वी व्हावी, यासाठी शुक्रवारी विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार हे काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांच्यासह ठाण्यात आले होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वरील भाकीत केले.  आता जे दिसत आहे त्यात बदलाचे वारे दिसत आहे. याच दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला राहिलेला नाही. बदनामी करून बळकवलेले किल्ले हे साफ होणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. पक्ष फोडून नेते पळून ज्यांनी या राज्याच्या अस्मितेला डाग लावला त्यांच्या उरात या यात्रेने धडकी भरली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर भाजप सत्तेपासून दूर आहे. त्यामुळे त्यांना जागा कुठून मिळणार असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

 राहुल गांधींची मुंबईत होणार सभादुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेची मुंबईत सांगता होत असताना, त्या निमित्ताने मुंबईत शिवाजी पार्क येथे होणारी सभा ही जोरातच होईल. या सभेला इंडिया आघाडीमधील १५ मित्र पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये तेजस्वी यादव, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, शरद पवार आदी उपस्थित राहणार आहेत. ही यात्रा यशस्वी होणार आणि देशात बदल निश्चितच होणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसBJPभाजपा