ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भाजप करणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:46 IST2021-09-15T04:46:00+5:302021-09-15T04:46:00+5:30

ठाणे : राज्य सरकारच्या हलगर्जीमुळे ओबीसी आरक्षणाशिवाय पाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याचा आरोप भाजपचे ठाणे शहर ...

BJP will agitate on the issue of OBC reservation | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भाजप करणार आंदोलन

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भाजप करणार आंदोलन

ठाणे : राज्य सरकारच्या हलगर्जीमुळे ओबीसी आरक्षणाशिवाय पाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याचा आरोप भाजपचे ठाणे शहर जिल्हाअध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांनी केला आहे. सरकारच्या विरोधात १५ सप्टेंबर रोजी आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी व शरद पवार यांनी खुलासा करावा, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली. सरकारच्या विरोधात भाजप ठाण्यासह राज्यभर तालुका पातळीवर आंदोलन करणार असल्याचेही डावखरे यांनी स्पष्ट केले.

Web Title: BJP will agitate on the issue of OBC reservation