शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्रात सध्या कायद्याचे राज्य नसून गुंडाराज"; भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 15:36 IST

BJP Chitra Wagh Slams Thackeray Government : महाराष्ट्रात व्यावसायिक, प्रशासकीय महिला अधिकारी देखील सुरक्षित नाहीत त्यामुळे इथे गुंडाराज असल्याचा आरोप त्यांनी केला.

ठाणे - महाराष्ट्रात सध्या कायद्याचे राज्य नसून गुंडाराज असल्याची टीका भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी केली. राज्यात अशा प्रकारे गुंडाराज पसरत असल्याने महिला दहशतीखाली जगत असल्याची गंभीर टीका देखील त्यांनी केली आहे. ठाणे  महापालिकेच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या सुरक्षा रक्षक यांची बुधवारी रुग्णालयात भेट घेऊन त्यांनी विचारपूस केली. पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्याचा निषेध करीत चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरत महाराष्ट्रात सरकार नावाची चीज आहे का? असा सवाल केला. 

महाराष्ट्रात व्यावसायिक, प्रशासकीय महिला अधिकारी देखील सुरक्षित नाहीत त्यामुळे इथे गुंडाराज असल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेची संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत, परंतु सध्याचे सरकार काय करत आहे, असा सवालही त्यांनी केला. फडणवीस सरकारच्या काळात फेरीवाले धोरण पुढे आणले गेले. परंतु आता ते धोरण राबविले जात नसल्यानेच फेरीवाल्यांची संख्या आणि त्यांची मुजोरी वाढत असल्याची टिकाही त्यांनी केली. महिलांचे कार्य करण्यासाठी विविध संघटना कार्यरत आहेत, परंतु त्यावर महिला नाहीत, ही एक शोकांतिका आहे. त्यामुळे या समित्यांमध्ये महिलांची निवड करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली. तर त्या अशा घटना भविष्यात होऊ नये यादृष्टीकोनातून ठोस पावले उचलण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देखील याबाबत एक ट्विट केलं आहे. "महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे एवढे धिंडवडे कधीचं उडाले नव्हते... कायदाराज नाही गुंडाराज सुरू आहे" असं म्हणत ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. "ठाणे मनपा उपायुक्त कल्पिता पिंपळे कर्तव्यावर असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करतं बोटे छाटण्यात आली… हे लिहीतानाही जीवाचा थरकाप होतोय... सुदैवाने त्या व अंगरक्षक पालवे वाचले. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे एवढे धिंडवडे कधीचं उडाले नव्हते...कायदाराज नाही गुंडाराज सुरू आहे इथे" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेthaneठाणेBJPभाजपाPoliticsराजकारण