"संजय राऊतांच्या मेंदूचे दोन भाग झालेत, सत्तेची भूक..."; भाजपा नेत्याचं टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 13:09 IST2025-03-16T13:05:22+5:302025-03-16T13:09:43+5:30
BJP Ashish Shelar And Sanjay Raut : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

"संजय राऊतांच्या मेंदूचे दोन भाग झालेत, सत्तेची भूक..."; भाजपा नेत्याचं टीकास्त्र
भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "संजय राऊतांच्या मेंदूचे दोन भाग झालेत, डोक्यात भुसा भरला आहे. त्यांना सत्तेची भूक आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "अराष्ट्रीय भावनेला मतासाठी खतपाणी घालतात ते कोणाकडे आहेत? याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यावं" असंही म्हटलं आहे.
"संजय राऊतांच्या मेंदूचे दोन भाग झाले आहेत. त्यांना सत्तेची भूक आहे. दोन तुकडे जरूर आहेत... भाजपा, एनडीए, अमित शाह, नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार. दोन भाग एवढेच आहेत राष्ट्रीय आणि अराष्ट्रीय... जो राष्ट्रीय भावनेने काम करतो त्यांच्यासोबत आम्ही आहोत."
"अराष्ट्रीय भावनेला मतासाठी खतपाणी घालतात ते कोणाकडे आहेत याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं. सर्वांच्या भावना ज्या आहेत त्याच आमच्या भावना आहे. राऊतांच्या डोक्यात भुसा भरला आहे. राऊत यांच्या बोलण्याला काही महत्व नाही" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे.
"संधी हुकणारा कार्यकर्ता हा कमजोर नाही, आम्ही त्याला कमी लेखत नाही. तो तार्यावर गेलाय, चंद्रावरती गेलाय असं तो मानत नाही... ज्या तीन कार्यकर्त्यांना संधी मिळाली ते उत्तम कार्यकर्ते आहेत, त्यांना शुभेच्छा आहेत" असं शेलार यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईच्यावतीने आयोजित ‘श्रमिकांच्या कलांचा महोत्सव’ या दोन दिवसीय विशेष सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलं आहे. ठाणे येथे आयोजित या महोत्सवात महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेला योगदान देणाऱ्या श्रमिक कलावंतांचा गौरव करण्यात आला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आशिष शेलार यांनी असं म्हटलं आहे.