शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांसाठी मोठी बातमी: मेट्रो स्टेशनच्या छत उभारणीसाठी शहरात १५ दिवस वाहतूक बदल; असा करावा लागेल प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 06:18 IST

माजीवडा ब्रिजवरून मुंबईकडून नाशिक अथवा घोडबंदरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : घोडबंदर भागात सध्या मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून माजीवडा मेट्रो स्टेशन येथे उभारण्यात आलेल्या मेट्रो स्टेशनवर ५ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान मेट्रोचे छत उभारण्यासाठी कॉलम उभे केले जाणार आहेत. त्यावर जॅक बीम टाकून जॅक बीम उभारल्यानंतर राफ्टर उभारला जाणार आहे.

या काळात येथील वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे वाहतूक विभागाने दिली आहे. परंतु या कामामुळे वाहतूककोंडीत आणखी भर पडण्याची चिन्हे दिसत आहे. येथील काम ६० टनी मोबाइल क्रेनच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. त्यासाठी ही क्रेन मुंबई, नाशिक, घोडबदंर, माजीवडा उड्डाणपुलावरील मुख्य वाहिनीवर ज्युपिटर चढणी या ठिकाणी उभी करून हे काम होणार आहे. त्यासाठी माजीवडा ब्रिजवरून मुंबईकडून नाशिक अथवा घोडबंदरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल केले आहेत.

येथून वाहतूक बंद, असा करावा लागेल प्रवासमुंबईकडून घोडबंदर अथवा भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना विवियाना मॉल समोरील ब्रीज चढणीच्या सुरुवातीला दुभाजकाजवळ प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने ज्युपिटर हॉस्पिटल समोरील स्लीप रोडने जाऊन कापूरबावडी मार्गे इच्छीत स्थळी जातील.नाशिककडे जाणाऱ्या वाहनाही ब्रिज चढणीच्या सुरुवातीला प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यांनाही स्लीप रोडने जाऊन गोल्डन क्रॉसमार्गे पुढे जावे लागणार आहे. हे वाहतूक बदल ५ एप्रिल पासून १९ एप्रिलपर्यंत रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका