शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का! नरेश म्हस्के यांचा जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा; राष्ट्रवादीवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 23:20 IST

नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा देताना राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.

ठाणे: एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडलेले पाहायला मिळत असताना, दुसरीकडे आता ठाण्यातील शिवसेनेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत, पक्षाला पुन्हा एक मोठा धक्का दिला आहे. तसे पत्र म्हस्के यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठवले आहे. शनिवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ श्रीकांत शिंदे यांच्याकडून ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांत नरेश म्हस्के यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत, सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीकाही करण्यात आली. यावेळी नरेश म्हस्केही सहभागी झाले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांसह अपक्ष आमदारांना सोबत घेऊन बंडाचे हत्यार उपसले आहे. एकनाथ शिंदे यांनी केवळ ठाणे किंवा जिल्ह्यात नाही, तर महाराष्ट्रातही काम केले. त्यामुळेच त्यांना या आमदारांचा पाठिंबा लाभला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच शिवसेनेतील आमदारांनी त्यांना साथ दिली आहे. तसेच इतर अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत. तर मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीत राहून शिवसेनेची गळचेपी झालेली आहे, त्यामुळे आघाडीतून बाहेर पडले पाहिजे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. 

जात,गोत्र अन् धर्म अमुचा शिवसेना , शिवसेना ,शिवसेना...!

नरेश म्हस्के यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये तसेच उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, भगवे आमचे रक्त तळपते,तप्त हिंदवी बाणा.. जात,गोत्र अन् धर्म अमुचा शिवसेना , शिवसेना ,शिवसेना...! त्यामुळे शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच.. पण गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची "राष्ट्रवादी" गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. जय महाराष्ट्र!, असे स्पष्ट केले आहे. 

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात आहोत

तसेच आम्ही गेली अनेक वर्ष एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करत आहोत. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ झालेल्या शक्तिप्रदर्शनावेळी शिवसेनेचे सर्व ६७ नगरसेवक यावेळी उपस्थित होते. आमच्या सर्व शिवसैनिकांचे एकच म्हणणे आहे की, आजही आम्ही शिवसेनेत आहोत. शिवसेनेत राहणार आहोत. आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात आहोत. हिंदुत्वाच्या समर्थनार्थ एकनाथ शिंदे यांनी जी हाक दिली आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. मी शिवसैनिक आहे आणि भविष्यातही राहणार आहे. तसेच सुमारे महिन्याभरापूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांना या सर्व परिस्थिती सांगितलेली आहे. आता पुन्हा भेटून बोलण्यात काही अर्थ नाही. माझ्या राजीनाम्याची प्रत पाठवून देत असल्याची माहिती नरेश म्हस्के यांनी दिली.  

टॅग्स :thaneठाणेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे