Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 12:21 IST2025-05-03T12:17:11+5:302025-05-03T12:21:02+5:30

Bhiwandi Crime News: भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने तीन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. 

Bhiwandi Crime: Husband came home from work and found the bodies of his wife and three daughters, even the police were shocked! | Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!

Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!

-नितीन पंडित, भिवंडी
Maharashtra Crime news: पती कामावर गेलेला असताना महिलेने तीन मुलींसह आयुष्य संपवलं. भिवंडी शहरातील फेणेगाव येथे ही घटना घडली. महिलेने आधी मुलींना फाशी दिली आणि नंतर स्वतः गळफास घेतला. पती कामावरून घरी आल्यानंतर त्याला चौघींचे मृतदेहच दिसले. या घटनेने भिवंडीमध्ये खळबळ उडाली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भिवंडी शहरातील फेणेगाव येथे चौघींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (३ मे) समोर आली. 

वाचा >>जळगाव: मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने केला खून

मयतांची नावे कळू शकलेली नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, घरात महिला आणि एक १२ वर्षांची, एक ६ वर्षांची आणि एक ४ वर्षांची मुलगी होती. महिलेचा पती रात्रपाळीत काम करतो. 

पती रात्रपाळीच्या कामावर गेल्यानंतर चौघींनी आत्महत्या केल्याची घटना घडली. पती सकाळी ९ वाजता घरी आला. तेव्हा त्याला घरात चौघी मृतावस्थेत दिसल्या. 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर भिवंडी शहर पोलिसांनी दुर्घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. महिला आणि मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. 

महिलेने तीन मुलींसह आत्महत्या का केली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. 

मुलाचा मृतदेह दुकानात पुरला

काही दिवसांपूर्वीच भिवंडीत एक भयंकर प्रकार समोर आला होता. एका मौलानाने अल्पवयीन तरुणाची हत्या केल्याचे उघड झाले. २० नोव्हेंबर २०२० मध्ये १७ वर्षीय शोएब शेख हा युवक बेपत्ता झाला होता. 

या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला. मौलवी गुलाम रब्बानी शेख यानेच शोएबची हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले. त्याला अटकही करण्यात आली.

मौलवीने शोएबची हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे केले. काही तुकडे कचऱ्यात फेकले, तर काही त्याच्या किराणा दुकानातच पुरले होते. 

Web Title: Bhiwandi Crime: Husband came home from work and found the bodies of his wife and three daughters, even the police were shocked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.