शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
3
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
4
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
5
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
6
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
7
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
8
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
9
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
10
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
12
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
13
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
14
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
15
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
16
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
17
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
18
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच केजरीवाल यांना अटक का? सर्वोच्च न्यायालयाची ईडीला विचारणा; म्हणाले...
20
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 

अवजड वाहतुकीसाठी भाईंदर-मुंबई पोर्ट ट्रस्ट-जेएनपीटी जलमार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 2:15 AM

जहाजबांधणी मंत्रालयाने भिवंडी-ठाणे-जेएनपीटी या मार्गावर दररोज धावणाऱ्या सुमारे १००० अवजड वाहनांसाठी भाईंदर-मुंबई पोर्ट ट्रस्ट-जेएनपीटी या दरम्यान पर्यायी जलमार्ग सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत.

ठाणे : ठाणे शहरावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचा लॉजिस्टिक विभाग समन्वयाचे काम करण्यासाठी सिद्ध आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालय, रेल्वे आणि जहाजबांधणी मंत्रालयानेही यासाठी समन्वयाने काम करण्याची भूमिका घेतली आहे. रेल्वेने उरण-भिवंडी-बोईसर या मार्गावर रो-रो सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी सुरू केली असून, जहाजबांधणी मंत्रालयाने भिवंडी-ठाणे-जेएनपीटी या मार्गावर दररोज धावणाऱ्या सुमारे १००० अवजड वाहनांसाठी भाईंदर-मुंबई पोर्ट ट्रस्ट-जेएनपीटी या दरम्यान पर्यायी जलमार्ग सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत. शिवाय वसई, मीरा-भार्इंदर-ठाणे मार्गावर जल-टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत जेएनपीटीने सर्व पूर्वतयारी केली असून, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाद्वारे लवकर हालचाल झाल्यास हा प्रस्तावही पुढे जाऊ शकेल. या सर्व विषयांत राज्य सरकारनेही वेगाने पावले उचलली तर ठाणेकरांची वाहतूक तणावमुक्ती लवकर प्रत्यक्षात येऊ शकेल, असे प्रतिपादन केंद्रीय जहाजबांधणीमंत्री मनसुख मांडविया यांनी ठाण्यात केले.‘ट्रॅफिक तणाव-मुक्त ठाणे’ या लोकाभियानांतर्गत खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या विनंतीवरून मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या लॉजिस्टिक विभागाने केंद्र, राज्य सरकार, रेल्वे, स्थानिक महापालिका, जेएनपीटी, एमबीपीटी व अन्य सरकारी यंत्रणा यांची समन्वय बैठक बोलाविली होती. तिच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी सहस्रबुद्धे यांनी बैठकीमागची भूमिका विशद केली.या बैठकीस खासदार कपिल पाटील, मनोज कोटक, आमदार मंगलप्रभात लोढा, संजय केळकर, निरंजन डावखरे, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, ठाण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, मध्य आणि पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी प्रभृती उपस्थित होते.वसईजवळ मिठागरांच्या जमिनीवर लॉजिस्टिक पार्कलॉजिस्टिक विभागाने अन्य मंत्रालयांच्या मदतीने आखलेल्या योजनेनुसार वसईजवळ मिल्टमोडल लॉजिस्टिक पार्कउभारण्यात येणार असून, ते प्रत्यक्षात आल्यानंतर अहमदाबादकडून येणाºया ट्रक्सना ठाण्यातच नव्हे तर मुंबईतही प्रवेश करण्याची आवश्यकता राहणार नाही. या संदर्भात मिठागरांची वापरात नसलेली जमीन उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र सरकारची सकारात्मक भूमिका असल्याचे मनसुख मांडविया यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांना निवेदन देणारयेत्या २१ तारखेला खासदार सहस्रबुद्धे आणि डावखरे हे भाजपच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठाण्यातील वाहतूककोंडीसंदर्भातील निवेदन देणार आहेत. या मागणीपत्रात कोपरी पुलाचे व मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करावी, पर्यायी मार्ग जलदगतीने विकसित करावेत आणि ठाणेकरांसाठी संपूर्ण टोलमुक्ती करावी, अशा प्रमुख मागण्या आहेत.वसई-ठाणे-कल्याण जलमार्गासाठी सागरमालातून निधीवसई-ठाणे-कल्याण खाडीतील अंतर्गत जलमार्ग पुढील वर्षभरात विकसित होईल. या मार्गावर मे महिन्यापासून चाचणी घेतली जाईल. त्यातून ट्रकची वाहतूक करण्यासाठी सागरमाला प्रकल्पातून संपूर्ण निधी दिला जाईल. या मार्गासाठी आतापर्यंत १०० कोटी रुपये देण्यात आले आहेत, अशी माहिती मांडविया यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेwater transportजलवाहतूक