शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

भाईंदरमध्ये आवाज पोलिसांचाच, ध्वनिप्रदूषणाच्या जाचातून नागरिकांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 1:39 AM

मीरा- भाईंदरमध्ये यंदा नवरात्रीनिमित्त ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद वाजवण्यासाठी असलेल्या रात्री दहाच्या वेळेची पोलिसां कडून अमलबजावणी केली जात असल्याने यंदा तरी आवाज पोलिसांचाच असल्याचे चित्र आहे.

मीरा रोड : मीरा- भाईंदरमध्ये यंदा नवरात्रीनिमित्त ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद वाजवण्यासाठी असलेल्या रात्री दहाच्या वेळेची पोलिसां कडून अमलबजावणी केली जात असल्याने यंदा तरी आवाज पोलिसांचाच असल्याचे चित्र आहे. दहा ते सव्वादहा दरम्यान बहुतांश मोठे आणि व्यावसायिक आयोजकांचे कार्यक्रम बंद होत असल्याने नागरिकांनी ध्वनी प्रदूषणाच्या जाचातून सुटका झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.शहरात नवरात्रीला सुरूवात झाली असून विधानसभा निवडणुका असल्याने नवरात्रीला राजकीय रंग आला आहे. राजकारणी व लोकप्रतिनिधींमध्ये गरबा आयोजनासाठी वेगवेगळे गायक व कलाकार आणणे, बक्षिसे यात स्पर्धाच लागली आहे. आॅर्केस्ट्रा साऊंड, डीजेसारख्या कानठळ्या बसवणाऱ्या ध्वनियंत्रणांचा दणदणाट चालला आहे. उमेदवार व त्यांचे समर्थक नवरात्रीच्या आड आपला प्रचार करण्याचा खटाटोप करताना दिसत आहेत.रात्री दहापर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी असली तरी त्या नंतरही सर्रास ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद सुरू असल्याचा अनुभव आहे. पोलीस फक्त येऊन समज देऊन गेले की पुन्हा मंडळवाले ध्वनिक्षेपक सुरु करतात. कानठळ्या बसवणाºया आवाजाच्या वाढत्या पाºयामुळे सर्वसामान्य नागरिक त्रासले आहेत. ज्येष्ठ नागरिक, रूग्ण, लहान मुले यांना तर आवाज जाचक ठरत आहे. विद्यार्थी व कामावर जाणाºया बहुसंख्य नागरिकांनाही झोप पूर्ण होत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. निदान रात्री १० वाजता ध्वनिक्षेपक बंद होईल अशी त्यांची आशा असते.यंदाच्या नवरात्रीलाही सुरूवातीला तसा अनुभव आला होता. पण ध्वनिप्रदूषणाने होणाºया त्रासाने वैतागलेल्या जागरूक नागरिकांनी ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनी स्वत:हून गस्त घालून रात्री १० नंतर ध्वनिप्रदूषण करणा-या ध्वनिक्षेपक वा ध्वनियंत्रणांसह आयोजकांवर कारवाई करतानाच गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.यंदा मात्र पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाने त्रासलेल्या वृध्द, रुग्ण, विद्यार्थी, लहान मुले आदी नागरिकांना सुखद धक्का देतानाच मोठा दिलासा दिला. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी ध्वनिप्रदूषणाचा वाढता धोका आणि सामान्य नागरिकांना होणारा त्रास पाहता पोलिसांनी रात्री दहा वाजता ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद बंद करण्याचे आदेश दिले होते. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनीही पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत ध्वनिप्रदूषण रोखण्यासह वेळेची मर्यादा काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश दिले होते.वरिष्ठांच्या आदेशांमुळे पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांनीही कुणाचा मुलाहिजा न ठेवता वेळेची मर्यादा पाळण्याची कार्यवाही चालवली आहे. काही ठिकाणी आयोजक मुजोरी करत असल्याने त्या ठिकाणी पोलिसच तैनात करण्यात आले आहेत.दरम्यान, पोलिसांच्या या भूमिकेचे नागरिकांनी कौतुक केले आहे. थोडी कडक पावले उचलल्याशिवाय जरब बसणार नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.यंदा पोलिसांनी स्वत:हून ध्वनिप्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करायला लावल्याने माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसह रूग्ण, मुले, महिला व नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे १० वाजता कार्यक्रम बंद होत असल्याने घरातील लहान तसेच तरुण मुले लवकर घरी परतत असल्याने पालकांच्या जीवाला लागणारा घोर यंदा मिटला आहे.- अनंत आंगचेकर, ज्येष्ठ नागरिक, भाईंदरनवरात्रीचे धार्मिक पावित्र्य राहिलेले नाही. केवळ मौजमजा चालली आहे. नवरात्रीच्या नावाने मुले रात्री उशिरापर्यंत नाहक फिरत राहतात ते बंद झालेच पाहिजे. ध्वनिक्षेपकची रात्री दहाची वेळ काटेकोर पाळली जावी. आवाजाची पातळीही तपासली जावी. १२ पर्यंतची सवलत बंद करावी. वाटल्यास शेवटचाच एक दिवस द्यावा. - जागृती केळकर, गृहिणी, भाईंदर

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस