पत्नीसोबत बोलल्यामुळे शेजाऱ्यास मारहाण; मीरा-भाईंदरमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 14:40 IST2022-04-10T14:40:19+5:302022-04-10T14:40:24+5:30

मीरा रोड : पत्नीसोबत शेजाऱ्यास बोलताना पाहून संशय आल्याने त्यातून पतीने साथीदारांना बोलावून शेजाऱ्यास मारहाण केल्याचा गुन्हा गुरुवारी भाईंदर ...

Beating a neighbor for talking to his wife; Shocking type in Mira Bhayandar | पत्नीसोबत बोलल्यामुळे शेजाऱ्यास मारहाण; मीरा-भाईंदरमधील धक्कादायक प्रकार

पत्नीसोबत बोलल्यामुळे शेजाऱ्यास मारहाण; मीरा-भाईंदरमधील धक्कादायक प्रकार

मीरा रोड : पत्नीसोबत शेजाऱ्यास बोलताना पाहून संशय आल्याने त्यातून पतीने साथीदारांना बोलावून शेजाऱ्यास मारहाण केल्याचा गुन्हा गुरुवारी भाईंदर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

भाईंदर पश्चिमेच्या उड्डाणपुलाजवळील वासुदेव नगरी, राधाकृष्ण इमारतीत राहणारे व्यावसायिक विनोद दशरथ मोदी (४२) यांच्या शेजारी अंकित विरानी व त्याची पत्नी निशा हे दहा वर्षांपासून राहतात. मोदी यांचे भाईंदरच्या बेकरी गल्लीतील चष्म्याचे दुकान असून निशा या छोट्या-मोठ्या कमासाठी मोदी यांच्या दुकानात येत होत्या.

बुधवारी सकाळी निशा या मोदी यांच्याशी दुकानात बोलत हाेत्या. ते पती विरानी यांनी पाहिले. त्यातून विरानी याचा गैरसमज झाला. त्याने मोदी यांना ९० फुटी मार्गावरील दीपकनगर येथे बोलावले. मोदी तेथे गेले असता विरानी यांनी त्यांचा भाऊ, दोन मित्र व एका महिलेस बोलावून घेतले. त्यांनी मोदी यांना शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बोटात टणक वस्तू घालून ठोशाने मोदी यांच्या नाकाचे मोडले. मोदी यांची पत्नी स्वाती या सोडवण्यास मधे पडल्या असता त्यांनाही धक्काबुक्की व शिवीगाऴी केली. जखमी मोदी यांच्यावर शासनाच्या भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. भाईंदर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Beating a neighbor for talking to his wife; Shocking type in Mira Bhayandar