बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना दिलासा! अटकेनंतर एकाच दिवसात दोघांना जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 16:11 IST2024-10-03T16:09:22+5:302024-10-03T16:11:53+5:30
Badlapur Sexual Assault Case: बदलापूर बलात्कार प्रकरणात सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात आलेले त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना काल रात्री पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना दिलासा! अटकेनंतर एकाच दिवसात दोघांना जामीन मंजूर
Badlapur Sexual Assault Case: बदलापूर बलात्कार प्रकरणात सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात आलेले त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना काल रात्री पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या प्रकरणात गुन्हा घडल्यापासून सातत्याने पोलिसांना हुलकावणी देत असलेले संस्थेचे चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना काल बुधवारी रात्री पोलिसांनी अटक केली. आज दोघानाही कोर्टात हजर करण्यात आले, आधी कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती आता कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
अटकेनंतर एकाच दिवसात उदय कोतवाल आणि तुषार आपटेला जामीन मिळाला आहे. कोर्टाने आधी दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या दोन्ही आरोपींना एका प्रकरणात जामीन तर दुसऱ्या प्रकरणात अटकेची परवानगी मिळाली आहे.
राज्यासह देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या बदलापूर बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदे हा गेल्या आठवड्यात पोलिसांसोबत झालेल्या कथित चकमकीत ठार झाला होता. मात्र या प्रकरणात सहआरोपी बनवण्यात आलेले बदलापूरमधील त्या शाळेतील दोन पदाधिकारी मात्र मात्र फरार असल्याने पोलीस प्रशासन आणि सरकारवर टीका होत होती. तसेच या वरून न्यायालयानेही खडेबोल सुनावले होते. अखेर पोलिसांनी या फरार पदाधिकाऱ्यांचा शोध घेत त्यांना कर्जत येथून ताब्यात घेतले आहे. बदलापूरमधील त्या शाळेचे सचिव तुषार आपटे आणि चेअरमन उदय कोतवाल यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता.