शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

बाबा रामदेव यांचा स्वदेशी ‘योग’नारा

By admin | Updated: January 23, 2016 02:50 IST

फेस क्रिम लावून कोणी गारे होत नाही. तसेच ‘कुछ तुफानी हो जाये..’ या जाहिरातीत जे शीतपेय आहे, ते थंड पेय नसून कार्बोनेट वॉटर आहे.

ठाणे : फेस क्रिम लावून कोणी गारे होत नाही. तसेच ‘कुछ तुफानी हो जाये..’ या जाहिरातीत जे शीतपेय आहे, ते थंड पेय नसून कार्बोनेट वॉटर आहे. घरातील स्वच्छता गृह स्वच्छ करण्यासाठी त्याचा चांगला वापर होऊ शकतो असा स्वदेशी नारा देत स्वदेशी उत्पादनांचा वापर करुन आपल्या देशातील अर्थकारण वाढीस लावा असा संदेश योगगुरु बाबा रामदेव यांनी बुधवारी ठाण्यात दिला. येथील दादाजी कोंडदेव स्टेडियममध्ये मधूसुदन ग्रुप व पतंजली योग समिती ठाणे यांच्या वतीने योग दिक्षा सभेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे, संजय केळकर, नरेश म्हस्के, रविंद्र फाटक, राकेश मोदी, नरेन्द्र जैन, मोहन तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी योग गुरु रामदेव बाबा यांनी सांगितले की, पतंजली हा भारतातील नंबर वन ब्रॅण्ड करणार. विदेशी वस्तूच्या वापरामुळे विदेशी कंपन्यांना आर्थिक फायदा होतो. स्वदेशी उत्पादने वापरल्यास गंगाजळी भारतात राहील. तिचा देशाच्या विकासासाठी उपयोग होईल. एक विदेशी ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली. भारत गुलामीत गेला. आजही भारत देश विदेशी कंपन्यांच्या आर्थिक गुलामीतून मुक्त झालेला नाही. तो मुक्त करण्याची जबाबदारी ही राष्ट्रभिमान बाळगणाऱ्या सगळ््याच प्रत्येक सुजाण नागरीकांची आहे असे रामदेव बाबा यांनी सांगितले. रिफाईंड तेल, केसांना लावले जाणारे विदेशी कंपन्यांचे तेल हे कॅन्सरसारख्या आजारांना आमंत्रण देणारे ठरते. पतंजलीच्या उत्पादनातून मिळणारा पैसा हा एखाद्या व्यक्तिच्या खिशात जात नसून तो सेवा क्षेत्रासाठी वापरला जातो. आपल्या देशात न्यूट्रीशियन एज्युकेशन कमी आहे. त्यामुळे विदेशी कंपन्यांचे चांगलेच फावले आहे. हे चित्र आपल्याला बदलावे लागेल. पतंजली रोजगार व आरोग्य देण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही रामदेव बाबा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)