शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

"१४ ऑगस्टच्या आत सरकारने छोट्या व्यापाऱ्यांवरील कोविडचे निर्बंध उठवावेत, अन्यथा..." 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 4:36 PM

डोंबिवली ग्रेन्स अँड मर्चन्ट्स असोसिएशनच्यावतीने शनिवारी शहरात एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

डोंबिवली: कोरानाच्या धर्तीवर लॉकडाऊन होऊन आता ५ महिने झाले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांप्रमाणेच आता शहरातील व्यापारी वर्ग देखील चिंतेत असून आर्थिक विवंचनेत आहे. त्या व्यापा-यांना राज्य शासनाने आता नियमांच्या बंधनात अडकवून आणखी समस्येत टाकू नये, १४ ऑगस्टच्या आत व्यापा-यांना असलेले निर्बंध उठवावे अन्यथा १५ ऑगस्टनंतर व्यापारी राज्य शासनाविरोधात रस्त्यावर उतरतील. त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिला.

डोंबिवली ग्रेन्स अँड मर्चन्ट्स असोसिएशनच्यावतीने शनिवारी शहरात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला डोंबिवली व्यापारी मंडळांतर्गत असलेल्या व्यापा-यांनी एकत्र येत राज्य शासनाच्या जाचक अटी, शर्थींवर नाराजी व्यक्त केली. राज्य शासन जर मद्य विक्रीसाठी प्रयत्नशील असेल तर या छोटया व्यापा-यांनी काय चूक केली आहे? असा सवाल चव्हाण यांनी केला.

छोटे व्यापारी आहेत, त्यात किराणा, कपडा, हॉटेल यांसह अन्य किरकोळ, घाऊक विक्रेत्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर अवलंबून असलेले सुमारे १ लाख कामगार यांचेही रोजगार यामुळे धोक्यात आले असून लाखो कुटुंबीयांचा प्रश्न असल्याने राज्य शासनाने आता त्याकडे दुर्लक्ष करू नये, असे ते म्हणाले.

१ लाख कामगारांना या व्यापा-यांनी कधी पूर्ण तर कधी अर्धे वेतन दिले असून आता त्यांच्या आर्थिक क्षमता संपुष्टात आली असून यापुढे लॉकडाऊन सहन होत नसल्याची भावना व्यापा-यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता व्यापार करायला मोकळीक द्यावी, शक्य असल्यास कर, भाडे यामध्ये सूट द्यावी आणि दिलासा द्यावा. पण यापुढे वेळेचे बंधन, वारांचे बंधन नसावे असे असोसिएशनच्या वतीने व्यापारी अजित शेट्टी, दिनेश गौर आदींनी प्रातिनिधीक स्वरुपात सांगितले. 

व्यापारी एकवटलेआम्हाला कोणाचा निषेध, विरोध करायचा नाही की राजकारण करायचे नाही. आम्हाला रितसर पहिलेसारखा व्यापार, व्यवसाय करायचा आहे. सगळयांचा विकास त्यातूनच होणार असून आम्हाला रोजगाराच्या संधी देऊन अर्थकारणाला वेग द्यायचा असल्याचे व्यापा-यांनी सांगितले. शहरातील हजारो व्यापारी एकत्र आले असून त्यांच्या संघटनांनी एकत्र येत राज्य शासनाला विनंती केली असून तरीही दुर्लक्ष झाल्यास रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस