शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मध्य प्रदेशातून ठाणे पोलिसांनी मिळवून दिली अपहारातील ऑडी कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 12:42 AM

वापरण्यासाठी घेतलेल्या ३० लाखांच्या ऑडी कारचा अपहार करुन ती मध्य प्रदेशात बेकायदेशीरपणे विकणाऱ्या हरिश्चंद्र भोईर याला नौपाडा पोलिसांनी अलिकडेच अटक केली. त्यापाठोपाठ ही मोटारही जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी रविवारी दिली.

ठळक मुद्देनौपाडा पोलिसांची कामगिरीआरोपीला एक महिन्यांपूर्वीच अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वापरण्यासाठी घेतलेल्या ३० लाखांच्या ऑडी कारचा अपहार करुन ती मध्य प्रदेशात बेकायदेशीरपणे विकणाऱ्या हरिश्चंद्र भोईर याला नौपाडा पोलिसांनी अलिकडेच अटक केली. त्यापाठोपाठ ही मोटारही जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी रविवारी दिली.ठाण्यात राहणाऱ्या अजय तन्ना यांनी एका बँकेतून कर्ज घेऊन ऑडी कार विकत घेतली होती. त्याच्याकडून हरिश्चंद्र भोईर याने ही कार दोन वर्षांपूर्वी वापरण्यासाठी घेतली होती. त्याबदल्यात या मोटारीच्या कर्जाचे हप्ते भोईर याने भरण्याचे ठरले. परंतू, त्याने नंतर हाप्तेही भरले नाही आणि मोटारही तन्ना यांना परत केली नाही. बँकेने तगादा लावल्यावर नवीन कर्ज घेऊ, असे सांगत भोईरने सुरेश मोरे याच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये याच मोटारीला तारण ठेवून घेतले. पण पुन्हा मोटारीसाठी भोईर आणि मोरे या दोघांनीही टोलवाटोलवी केली. अखेर याप्रकरणी २३ ऑक्टोबर रोजी मोटारीच्या अपहाराचा गुन्हा तन्ना यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केला. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगम पाटील यांच्या पथकाने आधी २३ ऑक्टोबर रोजी आरोपी हरिश्चंद्र भोईर याला अटक केली. त्यानंतर अपहार झालेली आणि बेकायदेशीरपणे मध्य प्रदेशात विकलेली ही ऑडी आणली. ती सुरेश मोरे याच्याकडे असल्याचा सुगावा लागल्यानंतर एका कार डीलरच्या मार्फतीने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील सुभाषनगरातून ही कार आणण्यात नौपाडा पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे भोपाळमध्ये न जाता, पोलिसांच्या वेळेची आणि पैशाची बचत करुन उपनिरीक्षक संगम पाटील, पोलीस नाईक सचिन खरटमोल आणि अंमलदार किशोर काळे यांनी तांत्रिक विश्लेषण आणि जनसंपर्काच्या माध्यमातून अपहारातील ही मोटार २५ नोव्हेंबर रोजी जप्त केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी