भिवंडीत अवघी साडे तीनशे रुपये भत्ता दिल्याने आशा सेविका संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 19:05 IST2026-01-15T19:05:32+5:302026-01-15T19:05:59+5:30
महापालिका निवडणुकीसाठी कर्मचारी म्हणून आशा सेविकांची नियुक्ती करण्यात आली होती.

भिवंडीत अवघी साडे तीनशे रुपये भत्ता दिल्याने आशा सेविका संतप्त
भिवंडी: महापालिका निवडणुकीसाठी कर्मचारी म्हणून आशा सेविकांची नियुक्ती करण्यात आली होती. सकाळी सात वाजल्यापासून आशा सेविका शहरातील विविध मतदान केंद्रांवर कर्तव्यासाठी हजर झाल्या होत्या. सायंकाळी सहा वाजता मतदान संपल्यानंतर या आशा सैनिकांना महापालिका मुख्यालयात दिवसभराचा भत्ता देण्यासाठी बोलविण्यात आले होते. मात्र यावेळी आशा सेविकांना अवघे साडे तीनशे रुपये मतदान भत्ता दिल्याने आशा सेविका प्रचंड नाराज झाल्या होत्या.
मतदानासाठी कर्तव्य बजावण्यासाठी घरापासून मतदान केंद्रावर जाण्यासाठी रिक्षा भाडे मोठ्या प्रमाणात खर्चून दिवसभर मतदानाचे काम केले.दिवसभरात आमच्या खाण्यापिण्याची देखील गैरसोय झाली असून सायंकाळी आमच्या हातात अवघ्या साडेतीनशे रुपये भत्ता दिला ही आमची चेष्टा केल्यासारखी आहे अशी प्रतिक्रिया येथील संतप्त आशा सेविकांनी दिली.