कल्याण, उल्हासनगरमध्ये चोरीला गेलेले 200 मोबाईल पोलिसांनी काढले शोधून
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 13:08 IST2017-09-27T13:06:59+5:302017-09-27T13:08:58+5:30
कल्याण आणि उल्हासनगरात चोरीला गेलेले तब्बल 184 मोबाईल शोधून काढत 19 आरोपींना अटक करण्यात ठाणे पोलिसांच्या मोबाईल चोरीविरोधी पथकाला यश आले आहे.

कल्याण, उल्हासनगरमध्ये चोरीला गेलेले 200 मोबाईल पोलिसांनी काढले शोधून
कल्याण - कल्याण आणि उल्हासनगरात चोरीला गेलेले तब्बल 184 मोबाईल शोधून काढत 19 आरोपींना अटक करण्यात ठाणे पोलिसांच्या मोबाईल चोरीविरोधी पथकाला यश आले आहे. चोरी झालेले हे सर्व मोबाईल आज कल्याणात आयोजित कार्यक्रमाद्वारे संबंधित व्यक्तींना परत देण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून कल्याण,डोंबिवली, उल्हासनगर परिसरात मोबाईल चोरीचे आणि हरवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. या घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी कल्याण आणि उल्हासनगर परिमंडळात मोबाईल चोरीविरोधी पथकाची स्थापना केली. या नव्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करीत अल्पावधीतच चोरीला गेलेले 43 आणि हरवलेले 143 असे सुमारे 22 लाख रुपये किमतीचे 184 मोबाईल शोधून काढत 19. त्यातही कल्याणच्या पथकाने सर्वाधिक म्हणजे 77 मोबाईल्स, डोंबिवली 58, उल्हासनबर 31 आणि अंबरनाथ पथकाने 4 मोबाईल शोधून काढले.
हरवलेली किंवा चोरीला गेलेले मोबाईल सहसा पुन्हा परत मिळत नाहीत असा लोकांचा समज झाला आहे. मात्र चोरीला गेलेले मोबाईल पोलीस शोधून काढतात आणि ते नागरिकांना परत देतात. या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त अंकित गोयल, कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय कांबळे, डोंबिवलीचे रविंद्र वाडेकर, उल्हासनगरचे सुनील पाटील यांच्यासह मोबाईल विरोधी पथकाचे संबंधित पोलीस अधिकारी उपस्थित होते.