शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अर्नाळा किनाऱ्यावर होते रात्रभर बेकायदा रेती उत्खनन

By admin | Updated: February 15, 2016 02:54 IST

गेल्या अनेक वर्षांपासून रात्रीच्या वेळी अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर रेतीचे बेकायदा उत्खनन केले जात असल्याने किनाऱ्यावर आता मोठाले खड्डे पडले आहेत.

शशी करपे , वसईगेल्या अनेक वर्षांपासून रात्रीच्या वेळी अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर रेतीचे बेकायदा उत्खनन केले जात असल्याने किनाऱ्यावर आता मोठाले खड्डे पडले आहेत. तर समुद्राचा नैसर्गिक बंधारा नष्ट होऊ लागल्याने सुुरुची बागही धोक्यात आली आहे. बेकायदा उत्खनन वेळीच रोखले नाही तर नैसर्गिक बंधारा नष्ट होऊन पावसाळ्यात उधाणाचे पाणी गावात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.अर्नाळा समुद्रकिनारी रात्री दहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत किमान शंभर मजूर बेकायदा रेती उत्खनन करतात. त्यानंतर ही रेती गाडीतून शहरात विकली जाते. या धंद्यात अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा शिरकाव झाला असून त्यांना महसूल आणि पोलीस यंत्रणेची साथ असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. बेकायदा रेती उत्खननामुळे समुद्रकिनारी मोठे खड्डे पडले आहेत. भरतीच्या वेळी हे खड्डे पाण्याखाली जातात. याचा अंदाज नसल्याने पर्यटक बुडण्याचे प्रकार वाढले आहेत. बेकायदा रेती उत्खननाने अर्नाळ्याचा समुद्रकिनारा आता धोकादायक बनला आहे. गेल्या दहा वर्षांत किमान तीसहून अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. सध्या ग्रामपंचायतीने एक गार्ड कायमस्वरुपी तैनात ठेवला असून गार्ड आणि गावकरी पर्यटकांना वारंवार सूचना देऊन धोकादायक ठिकाणापासून दूर पोहण्याचा सल्ला देत असतात. पण, त्यानंतरही वर्षाला किमान दोन-तीन पर्यटक बुडून मरण पावत आहेत. दुसरीकडे, मोठ्या प्रमाणावर रेती उत्खनन होत असल्याने सुुरुची झाडे कोलमडून पडू लागली आहेत. रेतीमाफियांविरोधात गावकरी अधूनमधून कारवाई करीत असतात. रेती काढणारे मजूर आणि रेती वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडून दिल्या जातात. पण, पोलीस आणि महसूल खात्याशी अर्थपूर्ण संंबंध असल्याने थातूरमातूर कारवाई करून सोडले जाते. मध्यंतरी रेतीमाफियांनी विरोध करणाऱ्या काही गावकऱ्यांवरच खोटे गुन्हे नोंदवून त्यांना अडचणीत आणण्याचे काम केले. उपसरपंच सतीश तांडेल यांच्याविरोधात रेती वाहतूक करणाऱ्या एका गाडीच्या ड्रायव्हरच्या पत्नीने विनयभंगाचा आरोप केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी तांडेल यांच्याविरोधात गुन्हाही नोंदवला होता पण, ग्रामपंचायतीच्या प्रत्येक ग्रामसभेत रेती उत्खननाविरोधात ठराव केले जात आहेत. पण, त्यावर काहीच कारवाई होत नसल्याने गावकरी हताश झाले आहेत. ग्रामसभेच्या ठरावाची पोलीस, महसूल आणि जिल्हा परिषदेकडून दखल घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. वसईत चोरीची रेती उत्खनन आणि वाहतूक होत नसल्याचा दावा महूसल खात्याकडून केला जात होता. पण, गेल्याच आठवड्यात रेती चोरीप्रकरणी दंडाची रक्कम कमी करण्यासाठी खानीवली येथील तलाठ्याला मुंबई अँटीकरप्शन विभागाने अटक करून महसूल खात्याल सणसणीत चपराक लगावली आहे.