शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाच्या आदेशाने ४ स्वीकृत सदस्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:47 IST

मीरा रोड : मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर मीरा भाईंदर महापालिकेने ४ स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली आहे. हा माजी ...

मीरा रोड : मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर मीरा भाईंदर महापालिकेने ४ स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली आहे. हा माजी आमदार नरेंद्र मेहतांचा विजय असून, मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला लगावलेली सणसणीत चपराक असल्याचा टोला भाजपचे पालिकेतील सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी लगावला आहे.

मीरा भाईंदर महापालिकेतील ५ स्वीकृत सदस्य नियुक्तीची प्रक्रिया गेल्या वर्षी झाली. त्यात भाजपचे ३ व शिवसेना, काँग्रेसचा प्रत्येकी १ सदस्य जाणार आहे. परंतु शिवसेनेचे उमेदवार विक्रमप्रताप सिंह यांच्या संस्थेला कोरोना संसर्ग काळात जेवण पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले होते. ते ठेकेदार असल्याने त्यांच्या नियुक्तीला भाजपने विरोध केला. महासभेतदेखील भाजपने विक्रमप्रताप यांचे नाव कापून भाजपचे अजित पाटील, अनिल भोसले, भगवती शर्मा आणि काँग्रेसच्या ॲड. शफीक खान यांच्या नावाला मंजुरी दिली. त्याविरोधात आमदार गीता जैन यांनी तक्रार केली असता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली. दुसरीकडे नितीन मुणगेकर नावाच्या नागरिकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्वीकृत सदस्यांच्या निकष, नियमानुसार उमेदवार नसल्याने नियुक्तीस आक्षेप घेतला. न्यायालयाने त्यावरून नियुक्तीस स्थगिती दिली. परंतु भाजपचे पालिकेतील पदाधिकारी व उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर न्यायालयाने मुणगेकर यांची याचिका रद्द करून अंतरिम स्थगिती उठवली, तसेच नगरविकास मंत्री यांनी नव्याने सर्वांची सुनावणी घेऊन आठ आठवड्यांत निर्णय घ्यावा, असे आदेशही दिले होते. त्यानुसार शिंदे यांनी सुनावणी आयोजित केली. पण, आयत्यावेळी ती पुढे ढकलली. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी व उमेदवार यांनी पुन्हा उच्च नायायालयात धाव घेतली. न्यायालयाने २५ फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेवर ताशेरे ओढत चार दिवसांत या चार स्वीकृत सदस्यांची नावे शासनाच्या गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या चारही स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होऊन महापालिकेने त्यांची नावे गॅझेटमध्ये प्रसिद्ध केली आहेत.

...........

न्यायालयाचा निर्णय स्वीकारावा

स्वीकृत सदस्यांच्या निवडीला खो घालण्याचा केविलवाणा प्रयत्न नगरविकास मंत्रालयाने केला होता. मात्र, शिवसेनेचे प्रयत्न हाणून पाडण्याचे काम भाजपचे नेते तथा माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी केले आहे. न्यायालयाचा निर्णय शिवसेनेने स्वीकारीत आपला पराभव आणि नरेंद्र मेहता यांचा विजय मान्य करायला हरकत नाही, असा टोला सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी लगावला आहे.

.............................