Another hotel at Varsave Naka was sealed by the municipality | कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यानं वरसावे नाक्यावरील आणखी एक हॉटेल पालिकेकडून सील 

कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यानं वरसावे नाक्यावरील आणखी एक हॉटेल पालिकेकडून सील 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने वरसावे नाका , घोडबंदर मार्गावरील एक्स्प्रेस इन हे मोठे हॉटेल कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने सील केले असताना आता त्याला लागून असलेले फाउंटन हे मोठे हॉटेल देखील पालिकेने सील केले आहे . फाउंटन मध्ये ५ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने ८ मार्च पर्यंत सदर हॉटेल सील केले आहे . 

नेहमीच वर्दळीचा आणि महाराष्ट्रच नव्हे तर अन्य विविध राज्यातील लोकांचा खान - पान व राहण्यासाठी नेहमीच  वरसावे नाका , घोडबंदर मार्ग व काशीमीरा महामार्गावरील हॉटेल - बार व लॉज मध्ये राबता असतो . त्यामुळे कोरोना संसर्ग व्यापकपणे पसरण्याचा मोठा धोका ह्या परिसरातील आस्थापनां मधून व्यक्त होत होता . 

पालिकेने येथील एक्स्प्रेस इन हॉटेल मध्ये सुरवातीला २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे एंटीजन चाचणीत आढळून आले होते . त्यामुळे सदर हॉटेल १८ फेब्रुवारी पासून ४ मार्च पर्यंत सील केले गेले . तर  आरटीपीसीआर चाचणी अहवालात देखील एक्स्प्रेस इन मधील आणखी ८ कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत . 

महापालिकेने या भागातील हॉटेल आदी आस्थापनां मधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी  आता एक्स्प्रेस इन लगतच असलेल्या फाउंटन हॉटेल मधील ५ कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे आढळून आल्याने महापालिकेने सदर हॉटेल देखील ८ मार्च पर्यंत सील केले आहे असे प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांनी सांगितले .    

Web Title: Another hotel at Varsave Naka was sealed by the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.