Thane: इतिहासाच्या पाऊलखुणा! ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात सापडले प्राचीन शिल्प!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:19 IST2025-11-18T13:16:50+5:302025-11-18T13:19:16+5:30

Thane Mental Hospital: ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात पगडी घातलेल्या संताची कोरीव प्रतिमा असलेला प्राचीन दगड सापडले.

Ancient Stone Carving Unearthed: Historical Relic Found During Demolition of Thane Regional Mental Hospital | Thane: इतिहासाच्या पाऊलखुणा! ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात सापडले प्राचीन शिल्प!

Thane: इतिहासाच्या पाऊलखुणा! ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात सापडले प्राचीन शिल्प!

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे: इतिहासाच्या पाऊलखुणा आजही जुन्या ठाण्याचे अस्तित्व दाखवून देत आहेत. शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने बदलत असताना, काळाच्या पडद्याआड गेलेल्या वारशाच्या अनेक खुणा समोर येत आहेत.  प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या पाडकामात पगडी घातलेल्या संताची कोरीव प्रतिमा असलेला प्राचीन दगड सापडल्याने ठाणेकरांत ऐतिहासिक उत्सुकता वाढली आहे.

नवीन आधुनिक मनोरुग्णालय उभारण्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या अनेक जुन्या इमारती हटविण्यात येत आहेत. याच प्रक्रियेत अनेकवर्षे बंद अवस्थेत असलेल्या एका बंगल्याचे पाडकाम सुरू होते. पाडकामादरम्यान एक सुंदर कोरीव दगड प्रकाशात आला आणि कामगारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. सुमारे अडीच ते तीन फूट उंच आणि सव्वा ते दीड फूट रुंद असलेल्या या दगडावर अत्यंत सूक्ष्म अशी कोरीवकाम केलेली शिल्पकला स्पष्ट दिसते. डोक्यावर पगडी घातलेले संत, त्यांच्या शेजारी उभा असलेला शिष्य आणि बाजूला उभी असलेली नर्तिका अशा तिन्ही प्रतिमा अतिशय प्राचीन कलाशैलीत साकारल्या आहेत. 

यापूर्वीही दिसले ब्रिटिशकालीन दगड 

रुग्णालय परिसरात यापूवीर्ही ब्रिटिशकालीन मुखवट्यांचे दगड बांधकाम पडताना दिसले. या जागेत अजूनही अनेक ऐतिहासिक अवशेष दडलेले असण्याची शक्यता अधिक बळावली आहे. शहराचा विकास आणि इतिहासाचा वारसा  या दोन गोष्टींची सांगड घालून जुन्या वस्तूंचे जतन करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

इतिहासाशी संबंधित कुठलीही नोंद नाही

प्राथमिक अंदाजानुसार हा दगड अत्यंत प्राचीन असण्याचा अंदाज आहे. या परिसराच्या इतिहासाशी संबंधित कोणतीही नोंद रुग्णालय प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने, या दगडाचा प्राचीन आणि सांस्कृतिक संदर्भ जाणून घेण्यासाठी अभ्यास करण्याची मागणी जोर धरत आहे. ठाणेकरांच्या मते, अशा मौल्यवान कलावस्तू आजच्या विकासाच्या काळात सापडणे ही दुर्मीळ गोष्ट असून अशा शिल्पकलेचे जतन करणे अत्यावश्यक आहे. यापूर्वी रुग्णालयाचे बांधकाम पाडताना प्राचीन दगड सापडले होते. त्यामुळे या वास्तूचा प्राचीन काळाशी काही तरी संबंध असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे कुठलही नोंद नाही. 

Web Title : ठाणे मनोरुग्णालय विध्वंस में प्राचीन मूर्ति मिली: एक ऐतिहासिक खोज

Web Summary : ठाणे के मनोरुग्णालय के विध्वंस के दौरान एक प्राचीन मूर्ति मिली। नक्काशीदार पत्थर में एक संत, शिष्य और नर्तकी दर्शाए गए हैं, जिससे ऐतिहासिक जिज्ञासा बढ़ रही है। पहले के ब्रिटिश काल के निष्कर्षों से और छिपे हुए अवशेषों का पता चलता है। शहर के विकास के साथ इन ऐतिहासिक कलाकृतियों के संरक्षण का आग्रह किया गया है।

Web Title : Ancient Sculpture Unearthed During Thane Mental Hospital Demolition: A Historical Find

Web Summary : An ancient sculpture was discovered during the demolition of Thane's mental hospital. The carved stone depicts a saint, disciple, and dancer, sparking historical curiosity. Previous British-era finds suggest more hidden relics. Preservation of these historical artifacts is urged as the city develops.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.