ठाणे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 02:19 AM2020-04-15T02:19:24+5:302020-04-15T02:20:45+5:30

कोरोनाचा चढता आलेख : जिल्ह्यात १२ रुग्ण वाढले

Anand Paranjpe, the city president of Thane Rashtrawadi, rushed to the hospital | ठाणे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे रुग्णालयात दाखल

ठाणे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे रुग्णालयात दाखल

googlenewsNext

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. ठाणे शहरांत गेल्या २४ तासांत सात नवीन रुग्णांची भर पडल्याची माहिती महापालिकेने दिली. यामध्ये ठाण्यातील राष्टÑवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. यापूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ताफ्यातील पाच सुरक्षारक्षक, आचारी २ कार्यकर्ते अशा १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असतांनाच आता त्यात राष्टÑवादीच्या या बड्या नेत्याचा यात समावेश झाला आहे. दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २५१ झाली झाली आहे. तर ११ जणांचा मृत्यू आतापर्यंत झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट अधिकच गडद होत आहे.

जिल्ह्यात मंगळवारी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक सात नवीन रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या ८२ वर पोहोचली आहे.
मंगळवारी राष्टÑवादीच्याच ठाण्यातील शहर अध्यक्षाला कोरोनाची लागण झाल्याची मााहिती समोर आली. कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कात आल्यानेच त्यांना त्याची लागण झाल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर पदाधिकाऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून सुरु झाले आहे. सोमवारी शहरात ३० रुग्णांची भर पडल्यानंतर मंगळवारी त्यात आणखी सात जणांची भर पडली असून शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा हा आता कल्याण डोंबिवलीहून अधिकचा झाला आहे.

नवी मुंबईतील रुग्णांची संख्या ५१ वर
शहरात आजघडीला ८२ जणांना याची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. तर ४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एका नव्या रु ग्णांची नोंद झाली असून आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत नवी मुंबईत एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. तेथील रु ग्णाच्या आकडा ५१ वर पोहोचला, मीरा-भार्इंदरमध्येदेखील मंगळवारी दोन रु ग्णांची नोंद झाल्यामुळे येथील कोरोनाबाधितांची संख्या ४९ वर पोहोचली आहे. तर, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी या भागात एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही. तर ठाणे ग्रामीण क्षेत्रात २ नवीन रुग्ण मंगळवारी आढळून आल्याने येथील रुग्णांची संख्या पाच झाली आहे.

Web Title: Anand Paranjpe, the city president of Thane Rashtrawadi, rushed to the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.