शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

‘तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत हद्दीत रोहयोची कामे द्यावीत’

By admin | Updated: October 5, 2015 00:10 IST

प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे आणि हे काम किमान १०० दिवस मिळावे, यासाठी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली.

विक्रमगड : प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे आणि हे काम किमान १०० दिवस मिळावे, यासाठी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत मागणीनुसार कामांना मंजुरी दिली जाते. या कामावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांचे नियंत्रण असून ग्रामपंचायत बांधकाम विभाग, पाणीपुरवठा, कृषी विभाग तालुका कृषी सामाजिक वनीकरण, वन विभाग या विभागातून रोजगार दिला जातो. परंतु, ५० टक्के काम ग्रामपंचायत स्तराने घेणे अपेक्षित असताना मात्र ठरावीक ग्रामपंचायतीतच रोजगार हमीची कामे होतात. त्यामुळे तालुक्यातील ६० ते ७० हजार जॉबकार्डधारकांना ठरावीक हद्दीत काम मिळते व बाकीच्या मजुरांना स्थलांतर करावे लागते. हे विदारक चित्र असून तालुक्यातील ४३ ग्रामपंचायती व ४०० ते ५०० गावपाड्यांतील मजुरांना काम मिळणे आवश्यक असल्याची तक्रार स्थानिकांनी तहसीलदारमध्ये केली आहे.रोजगार हमीचे काम चालू करताना कामावरील मजुरांचे ई-मस्टर काढून ई-मस्टरमध्ये नाव असणाऱ्या मजुरालाच कामावर घेणे बंधनकारक असून सर्वांचे पगार हे बँकांमधूनच करण्यात यावे, अशी मागणीही झाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात बांधकाम विभागाकडून रस्त्यांचे खडीकरण व मातीकरण केले जाते. तरी सर्वच ग्रामपंचायत हद्दीत घेण्यात यावे, रस्त्याचे मातीकरण करण्याची कामे घेण्यात यावी, जे आवश्यक रस्ते आहेत, त्यांनाच प्राधान्य द्यावे, मजुरांना वेळेत पगार द्यावा, अपूर्ण असलेल्या विहिरी पूर्ण करून पगार द्यावा, अशा विविध समस्यांवर तहसीलदार कार्यालयात चर्चा करण्यात आली त्या सोडविण्यासाठी तहसील प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)