शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात ठामपाच्या यंत्रणा पडल्या कमी, अजोय मेहतांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांती कानउघाडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 18:37 IST

अधिकाऱ्यांची एवढी मोठी फळी असतांनाही ठाण्यात कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात कमी पडल्याचा ठपका ठेवत राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी ठाणे  महापालिकेच्या वरीष्ठ अधिका-यांची चांगलीच कान उघाडणी केली.

ठाणे  - एक आयुक्त, त्यांच्या मदतीला दोन अतिरिक्त आयुक्त, इतर अधिकारी या शिवाय शासनाकडून आलेले दोन सनदी अधिकारी एवढी मोठी फळी असतांनाही ठाण्यात कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात कमी पडल्याचा ठपका ठेवत राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी ठाणे  महापालिकेच्या वरीष्ठ अधिका-यांची चांगलीच कान उघाडणी केली.  ठाण्यासह जिल्ह्यातील इतर महापालिकांची देखील हीच परिस्थिती झाली असल्याने त्यांनी शुक्रवारी ठाण्यात हजेरी लावली होती. अशी माहिती देखील महापालिकेच्या सुत्रंनी दिली. तर यापुढे कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी एक रुग्ण आढळला तर त्याच्या संपर्कातील कमीत कमी 20 लोकांना तत्काळ क्वॉरन्टाइन करा, रुग्ण तपासणींवर भर द्या, जास्तीत जास्त क्वॉरन्टाइन सेंटर वाढवा अशा महत्वाच्या सुचना राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिल्या. महापालिका मुख्यालयात ते कोरोना बाबत केलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे नगरविकास (2) विभागाचे प्रधान सचिव महेश फाटक, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त लोकेश चंद्र, नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार, जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर, महापलिका आयुक्त विजय सिंघल आदींसह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्व महापालिकांची एकत्र बैठक घेतली, मात्र ठाणे महापालिकेच्या पदाधिका:यांची स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली, तसेच खरडपटटी काढली. एक आयुक्त, दोन सनदी अधिकारी, नवीन अतिरिक्त आयुक्त आणि इतर अधिका:यांचा लवजमा असतांनाही ठाण्यात कोरोनाची साखळी तोडण्यात अजूनही अपयश का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. ठाण्यात आजच्या घडीला 4 हजाराहून अधिक कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत, दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे यावर आता वेळीच उपाय योजना करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.  जिल्हातील महापालिकांमध्ये कशा पध्दतीने कोरोना बाबत उपाय योजना करण्यात आल्या आहेत, याचा सविस्तर आढावा घेतला. कोरोनाला रोखण्यासाठी घरोघरी सव्र्हेक्षण करण्यावर भर देण्याबरोबरच एखाद्याला कोरोनाची लागण झाली असले तर त्याच्या संपर्कातील कमीत कमी 20 लोकांना तत्काळ क्वारन्टाइन करावे अशा सुचनाही त्यांनी केल्या. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना क्वॉरन्टाइन करणो हाच महत्वाचा उपाय असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे क्वॉरान्टाइन सेंटरची क्षमता वाढवा अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. तसेच क्वॉरन्टाइन सेंटरची क्षमता वाढविल्यास हॉस्पीटलची गरजही भविष्यात पडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय झोपडपटटी भागात ताप सव्र्हेक्षण मोहीम तीव्र करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. तर झोपडपटटी भागात एखादा रुग्ण आढळला तर त्याला रुग्णालयातच उपचार द्यावेत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच औषधांचा पुरवठाही व्यवस्थीत ठेवा असेही त्यांनी यावेळी सांगितले. कंटन्मेट झोन तयार करा, त्याची व्याप्ती वाढवा, जेणो करुन त्या भागातील नागरीक इतर भागात जाणार नाहीत, याची काळजी घ्या. हॉस्पीटलमध्ये बेडची क्षमता वाढविण्याबरोबरच हॉस्पीटलची क्षमता वाढविण्याच्या महत्वाच्या सुचनाही त्यांनी दिल्या. 

 राजकीय दबाव सहन करु नकायावेळी त्यांनी वरीष्ठ अधिका:यांची कान उघाडणी तर केलीच, शिवाय कोणताही राजकीय दबाव काम करतांना असेल तर तो सहन करु नका, असेही त्यांनी सांगितले आहे. ठाण्यात अनेक कामांमध्ये राजकीय लुडबुड सुरु आहे. ती कोरोनाच्या काळातही तशीच दिसून आली आहे, त्यामुळे हाच मुद्दा धरती त्यांनी राजकीय दबाव सहन करु नका असा सल्लाही दिला आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थतता पसरली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका