शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील वायुप्रदूषण; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 01:28 IST

नागरिकांनी १० दिवसांत मागितले उत्तर

- अनिकेत घमंडी डोंबिवली : एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणामुळे काही दिवसांपासून त्रस्त असलेल्या पूर्वेतील खंबाळपाड्यातील भोईरवाडी भागातील काही नागरिकांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबईतील संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पोस्टाद्वारे बुधवारी अधिकाऱ्यांना ही नोटीस मिळाली असून, अधिकारी त्याला काय उत्तर देतात, याकडे डोंबिवली अ‍ॅक्शन कमिटी फॉर सिव्हिक अ‍ॅण्ड सोशल होप्स (दक्ष) समितीच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.

खंबाळपाडा परिसरात एका बाजूला निवासी इमारती तर, त्यासमोरच्या बाजूला एमआयडीसीतील कारखाने आहेत. तेथील रासायनिक कारखान्यांमुळे वायुप्रदूषण होत असल्याने खंबाळपाडा, ठाकुर्ली व एमआयडीसी परिसरातील गावठाणांमधील रहिवासी त्रस्त आहेत. हे प्रदूषण एमआयडीसीतील काही रासायनिक कंपन्यामुळेच होत असल्याचे तेथील नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिले होते. तसेच वारंवार ई-मेल करून काही ठोस मागण्या ठेवल्या होत्या, परंतु सकारात्मक पावले उचलली गेल्याचे दिसत नाही. अनेकदा पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास रसायनांचा प्रचंड दर्प आल्याने श्वसनाचा त्रास झाल्याच्या तक्रारी खंबाळपाड्यातील रहिवाशांनी केल्या आहेत.

वायुप्रदूषण रोखण्यात केडीएमसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी या यंत्रणा हतबल ठरल्या आहेत. या यंत्रणांचे अधिकारी एकमेकांना दोष देताना दिसतात. पण, जबाबदारी कोणीही घेत नाही. प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी ही सर्वस्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. प्रदूषणकारी कंपन्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. पण, आतापर्यंत केवळ टोलवाटोलवी करण्यात येत असल्याने कायदेशीर पाऊल उचलण्याचा निर्णय नागरिकांच्या दक्ष समितीने घेतला.

वायुप्रदूषणप्रकरणी जाब विचारण्यासाठी खंबाळपाड्यातील काही नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित अधिकाºयांना अखेर कायदेशीर नोटीस पाठविली आहे. नोटिशीत नजीकच्या काळातील सर्व घटनांचा उल्लेख आहे. नागरिकांच्या मागण्यांसंदर्भात कोणती पावले उचलली, याबाबत अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट सादर करण्यासाठी मंडळाच्या अधिकाऱ्यांना १० दिवसांची मुदत दिली आहे.

प्रसंगी न्यायालयात दाद मागणार

प्रदूषणाविरोधात सुरू असलेला हा लढा केवळ खंबाळपाडा भागापुरता मर्यादित नाही. तो सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटिशीला उत्तर देण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. त्यावर उत्तर आल्यास त्याची माहिती १५ फेब्रुवारीला सर्वांना कळवली जाईल. मात्र, मंडळाने उत्तर न दिल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत उच्च न्यायालयाकडे दाद मागण्यात येईल, असे दक्ष समितीचे सदस्य व तक्रारदार अक्षय फाटक यांनी सांगितले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMaharashtraमहाराष्ट्रMIDCएमआयडीसीenvironmentपर्यावरणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार