शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरमध्ये आता ‘एअर मॉनिटरिंग सिस्टीम’

By admin | Updated: March 24, 2017 01:09 IST

बदलापूरमध्ये हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याचा अहवाल आल्याने खळबळ उडाली. हे प्रमाण कमी करण्यासाठी बदलापूर पालिकेने पुढाकार

पंकज पाटील / बदलापूरबदलापूरमध्ये हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याचा अहवाल आल्याने खळबळ उडाली. हे प्रमाण कमी करण्यासाठी बदलापूर पालिकेने पुढाकार घेतला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रकरणी ठोस पावले उचलत नसल्याने आता पालिकेने शहरात प्रदूषणाचे प्रमाण मोजण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेतले आहे. बदलापूरात पालिकेच्या वतीने ‘एअर मॉनिटरिंग सिस्टीम’ उभारली जाणार आहे. कुळगांव-बदलापूर हे शहर उल्हास नदीच्या तीरावरील निसर्गरम्य शहर म्हणून ओळखले जाते. प्रदूषणाचे प्रमाण कमी असल्याने मुंबई, ठाण्यातील नागरिकांची पहिली पसंती ही बदलापूर ठरली आहे. मात्र गेल्या महिन्यात एका संस्थेचा आलेल्या अहवालानुसार राज्यातील प्रदूषित शहरांच्या यादीत बदलापूर शहराचे नाव आल्याने बदलापूरकरांना त्या गोष्टींबाबत आश्चर्य वाटत आहे. शहरातील प्रदूषण वाढलेच कसे याची चाचपणी आता पालिकेने सुरु केली आहे. बदलापूर शहराचे प्रदूषण खरेच वाढले आहे की या अहवालात काही त्रुटी आहे हे उघड करण्यासाठी पालिकेने आता प्रदूषण नियंत्रण मंडळावर अवलंबून न राहता शहरातील हवेतील प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी ‘एअर मॉनिटरिंग’ सिस्टीम उभारण्याची तयारी केली आहे. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या विषयाला मंजुरी देखील देण्यात आली. नगराध्यक्ष वामन म्हात्रे आणि नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी ही यंत्रणा शहरात राबविण्याची सूचना केली. त्यानुसार सभागृहात या विषयाला मंजुरी देखील मिळाली आहे. एअर मॉनिटरिंग सिस्टीममुळे बदलापूरातील हवेतील प्रदूषणाचे प्रमाण प्रत्येक तासाला मिळणार आहे. हे प्रदूषण अधिक आढळल्यास त्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठवित या संदर्भात कारवाई करण्याची सूचना पालिका प्रशासन करणार आहे. केवळ औद्योगिक प्रदूषणाची चाचपणी केली जाणार नसून त्यात हवेतील धुळीचे प्रमाण आणि मानवी शरीराला बाधा निर्माण करणाऱ्या घातक घटकांची माहितीही घेणार आहे. त्यामुळे ही यंत्रणा उभारल्यावर नियमित पालिकेला त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे. तसेच हवेतील प्रदूूषणाचे प्रमाण वाढल्यास त्यास जबाबदार असलेल्या कंपन्या आणि संबंधित विभागावर कारवाई करण्यास मदत होणार आहे. ही यंत्रणा उभारण्यासाठी पालिका सल्लागार नेमणार असून त्यांच्या देखरेखीखाली हे काम केले जाणार आहे. या यंत्रणेसाठी स्वतंत्र कक्ष उभारले जाणार असून सरासरी आणि प्रत्येक तासाचा अहवाल हा पालिकेला उपयुक्त ठरणार आहे. ही यंत्रणा उभारण्यासाठी पालिकेला सुरुवातीला २५ लाखाची गरज असून त्या खर्चास मंजुरीही देण्यात आली आहे. तसेच ही यंत्रणा उभारल्यावर वर्षाला देखभाल दुरुस्ती आणि कामगारांच्या वेतनापोटी असे एकूण ८ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आले आहे.