इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर महापालिकेला जाग; कळवा, मुंब्य्रातील ७२५ घरांना नोटीस, मुंब्रा बायपासवरील ४५ कुटुंबाचे स्थलांतर

By अजित मांडके | Published: July 28, 2023 04:55 PM2023-07-28T16:55:19+5:302023-07-28T16:55:59+5:30

...या घटनेनंतर, याठिकाणीही इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडू नये म्हणून ठाणे महापालिका आणि वनविभागाने येथील ४५ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर बाजूच्याच शाळा, मशीद आणि मंदिरात केले आहे.

After the Irshalwadi tragedy, the Municipal Corporation wakes up; Notice to 725 houses in Kalwa, Mumbra, relocation of 45 families on Mumbra Bypass | इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर महापालिकेला जाग; कळवा, मुंब्य्रातील ७२५ घरांना नोटीस, मुंब्रा बायपासवरील ४५ कुटुंबाचे स्थलांतर

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर महापालिकेला जाग; कळवा, मुंब्य्रातील ७२५ घरांना नोटीस, मुंब्रा बायपासवरील ४५ कुटुंबाचे स्थलांतर

googlenewsNext

ठाणे : मुंब्रा बायपास रोडवरील मुंब्रा देवीच्या भागात गुरुवारी भुस्कलन झाले. या घटनेनंतर, याठिकाणीही इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडू नये म्हणून ठाणे महापालिका आणि वनविभागाने येथील ४५ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर बाजूच्याच शाळा, मशीद आणि मंदिरात केले आहे.
 
परंतु यापुढेही जाऊन कळवा आणि मुंब्य्रातील डोंगराच्या पायथ्याशी आणि डोंगरावर वसलेल्या तब्बल ७२५ घरांना महापालिकेने पुन्हा नोटीस बजावून येथील रहिवाशांना पावसाळ्यात स्थलांतर होण्याचे आवाहन केले आहे.

इर्शाळवाडी येथे घडलेल्या घटनेला आज १० दिवस होऊन गेले. यात २७ जणांचे प्राण गेले असून ५७ जण अद्यापही बेपत्ता आहेत. परंतु या घटनेनंतर ठाण्यातील १४ दरड प्रवण क्षेत्रांचा प्रश्न देखील पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यात कळवा, मुंब्रा आदी ठिकाणच्या भागांचा अधिक प्रमाणात समावेश आहे. त्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंब्रा बायपासवरील मुंब्रा देवी परिसरात भुस्कलन झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणत्याही जिवीत हानी झाली नसली तरी देखील ठाणे महापालिका आणि वनविभागाने खरबदारी घेत येथील ४५ कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. दुसरीकडे येथे अतिजोखीमीच्या भागात असलेली ९ घरे सील करण्यात आल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले.

यापुढे जाऊन आता महापालिका जागी झाली असून त्यांनी कळवा आणि मुंब्रा भागातील दरड प्रवण क्षेत्रात वास्तव्य करणाºया रहिवाशांना नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत येथील ७२५ घरांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यात कळव्यातील ५०० हून अधिक आणि मुंब्रा बायपासवरील २२५ घरांना नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. तसेच घरोघरी जाऊन येथील रहिवाशांना सर्तक राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. किमान पावसाळ्यापर्यंत तरी दुसरीकडे रहावे असे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

दुसरीकडे वनविभागाने देखील आता भुस्कलनाच्या घटनेनंतर जागे झाले असून, कळवा - मुंब्रा भागातील घोलाई नगर, आतकोनेश्वर नगर, कारगिल कोंडा आदी भागात पावसाचा जोर लक्षात घेत सर्तक राहण्याच्या सुचना करणारे फलक लावण्यात आले आहेत. तसेच येथील ८ ते १० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.

Web Title: After the Irshalwadi tragedy, the Municipal Corporation wakes up; Notice to 725 houses in Kalwa, Mumbra, relocation of 45 families on Mumbra Bypass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.