After Thane, now the lockdown has also increased in Mira Bhayander | ठाण्यानंतर आता मीरा भाईंदरमध्येही लॉकडाऊन वाढवला

ठाण्यानंतर आता मीरा भाईंदरमध्येही लॉकडाऊन वाढवला

ठळक मुद्देआज शेवटचा दिवस असल्याने आयुक्तांनी महापौर व अन्य पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत लॉकडाऊन वाढवायचा नाही असे ठरले होते.

मीरारोड : ठाणे शहरात लॉकडाऊन वाढवल्यानंतर मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 1 ते 10 जुलै पर्यंत लागू केलेला लॉकडाऊन आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी 18 जुलैपर्यंत वाढवला आहे. 

जून महिन्यात कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आयुक्तांनी 1 ते 10 जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला होता. आज शेवटचा दिवस असल्याने आयुक्तांनी महापौर व अन्य पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत लॉकडाऊन वाढवायचा नाही असे ठरले होते. 

स्वतः महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी देखील लॉकडाऊन वाढवायचा नाही असा निर्णय झाल्याचे म्हटले होते. परंतु नंतर मात्र ठाणे आदी अन्य महापालिकांनी लॉक डाऊन वाढवल्याने मीरा भाईंदर मध्ये देखील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सध्या 10 दिवसांचा घेतलेल्या लॉकडाऊनचे परिणाम येत्या आठवड्याभरात दिसतील. लॉकडाऊन वाढवला नाही तर 10 दिवसांच्या लॉकडाऊनचा उपयोग होणार नाही असा तर्क मांडत  विचारविनिमय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.  

आणखी बातम्या...

मनसैनिकांनी 'तो' स्टुडिओ फोडला; छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियनने दिला माफीनामा

...आधी नितीन गेला अन् आता सचिनही, पोलीस भावंडांचा पाठोपाठ मृत्यू

Gold Rate Today : सोन्याच्या दरात वाढ, पण चांदी घसरली, जाणून घ्या आजचे भाव

बिहारमध्ये चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त

Vikas Dubey Encounter : उमा भारती म्हणाल्या, "मारेकरी ठार झाला, पण तीन गोष्टी रहस्यमय"

'एक शरद अन् शिवसेना गारद', पवारांच्या मुलाखतीवरून नारायण राणेंचा टोला

Web Title: After Thane, now the lockdown has also increased in Mira Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.