Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Rate Today : सोन्याच्या दरात वाढ, पण चांदी घसरली, जाणून घ्या आजचे भाव

Gold Rate Today : सोन्याच्या दरात वाढ, पण चांदी घसरली, जाणून घ्या आजचे भाव

सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 07:58 PM2020-07-10T19:58:09+5:302020-07-10T20:20:38+5:30

सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

gold prices rise marginally today silver falls rs 352 know prices | Gold Rate Today : सोन्याच्या दरात वाढ, पण चांदी घसरली, जाणून घ्या आजचे भाव

Gold Rate Today : सोन्याच्या दरात वाढ, पण चांदी घसरली, जाणून घ्या आजचे भाव

Highlightsस्थानिक सराफा बाजारात चांदीच्या दरात घट झाल्याचे दिसून आले. आज चांदीचे दर प्रति किलो 352 रुपयांनी घसरले.

नवी दिल्ली : संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असताना आता आर्थिक मंदीचा प्रश्न देखील उभा राहिला आहे. सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गेल्या काही महिन्यापासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. 

शुक्रवारी सोन्याच्या दरात स्थानिक सराफा बाजारात किंचित वाढ नोंदविली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, आज राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम केवळ 8 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे दिल्लीतील सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 49,959 रुपयांवर गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा सोन्याच्या दरात किंचित वाढ नोंदविण्यात आली आहे.  

याचबरोबर, स्थानिक सराफा बाजारात चांदीच्या दरात घट झाल्याचे दिसून आले. आज चांदीचे दर प्रति किलो 352 रुपयांनी घसरले. चांदीचा दर 52,364 रुपये प्रति किलो झाला आहे. विशेष म्हणजे, चांदीचा भाव गुरुवारी 52,716 रुपये प्रति किलो होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सायंकाळी सोन्याचे जागतिक वायदा भाव कॉमेक्सवर 0.56 टक्के किंवा 10.10 डॉलरच्या वाढीसह 1813.90 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होते. याशिवाय, सोन्याची जागतिक किंमत सध्या 0.29 टक्के किंवा 5.32 डॉलरच्या वाढीसह 1808.87 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होती.

त्याचबरोबर, आंतरराष्ट्रीय पातळीवर शुक्रवारी संध्याकाळी वायदा भाव कॉमेक्सवर चांदीची किंमत 0.17 डॉलरची वाढ होऊन 19.14 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होती. याशिवाय, चांदीची जागतिक किंमत सध्या 0.65 टक्के किंवा 0.12 डॉलरच्या वाढीसह 18.77 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होती.

आणखी बातम्या...

बिहारमध्ये चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त

Vikas Dubey Encounter : उमा भारती म्हणाल्या, "मारेकरी ठार झाला, पण तीन गोष्टी रहस्यमय"

'एक शरद अन् शिवसेना गारद', पवारांच्या मुलाखतीवरून नारायण राणेंचा टोला

मोफत धान्य, मजुरांना भाड्याचे घर...; मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

मी कोरोना चाचणी केली, होम क्वारंटाईन होतोय - अमोल कोल्हे

खबरदार, पालकांकडून फी मागाल तर... ; 'या' राज्य सरकारचा खासगी शाळांना सज्जड इशारा

CoronaVirus News : कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात; जाणून घ्या, किंमत...

Web Title: gold prices rise marginally today silver falls rs 352 know prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.