मोफत धान्य, मजुरांना भाड्याचे घर...; मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 07:38 PM2020-07-08T19:38:05+5:302020-07-08T19:43:07+5:30

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मागील ३ महिन्यांत ८१ कोटी लोकांना दरमहा ५ किलो धान्य मोफत मिळाले आहे.

modi cabinet meeting decisions taken free ration | मोफत धान्य, मजुरांना भाड्याचे घर...; मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

मोफत धान्य, मजुरांना भाड्याचे घर...; मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

Next
ठळक मुद्देपंतप्रधान गृहनिर्माण योजनेंतर्गत १०७ शहरांमध्ये १ लाख ८ हजार छोटी घरे तयार आहेत. ही घरे मजुरांना भाड्याने देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी 5 महिन्यांत मोफत धान्य, मजुरांना भाड्याने घरे, सामान्य विमा कंपन्यांमध्ये १२ हजार ७५० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आले.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मागील ३ महिन्यांत ८१ कोटी लोकांना दरमहा ५ किलो धान्य मोफत मिळाले आहे. तसेच, जे धान्य २ रुपये आणि ३ रुपयांना मिळत आहे, तेही मिळाले आहे. पण हे धान्य मोफत मिळाले आहे. याचा अर्थ असा की गेल्या ३ महिन्यांत प्रत्येक व्यक्तीला १५ किलो धान्य मिळाले, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी यासंदर्भात घोषणा केली. आज मंत्रिमंडळाने याची अंमलबजावणी केली आहे. ही योजना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून त्यामध्ये एका व्यक्तीला ५ किलो मोफत धान्य मिळेल, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. तसेच, पहिल्या तीन महिन्यांत १ कोटी २० लाख टन धान्य देण्यात आले असून येत्या ५ महिन्यांत २ कोटी ३ लाख टन धान्य मोफत देण्यात येणार आहे. या योजनेचा खर्च १ लाख ४९ हजार कोटी रुपये आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ८ महिन्यात ८१ कोटी लोकांना मोफत रेशन मिळणार आहे, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. 

याचबरोबर, सरकारने आणखी एक योजनेचा विस्तार केला आहे. जे छोटे व्यवसाय आहेत. ज्याठिकाणी १०० पेक्षा कमी कर्मचारी आहेत आणि त्यातील ९० टक्के नोकरदारांना १५०० पेक्षा कमी पगार आहेत. अशा कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात सरकारने १२ टक्के पीएफ जमा केला आहे. याचा फायदा ३ लाख ६६ हजार उद्योगांना झाल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

याशिवाय, इतर निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, "पंतप्रधान गृहनिर्माण योजनेंतर्गत १०७ शहरांमध्ये १ लाख ८ हजार छोटी घरे तयार आहेत. ही घरे मजुरांना भाड्याने देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मजुरांना भाड्याने स्वस्त घरे मिळाली नव्हती, मात्र, आता सरकारने त्यांच्यासाठी हा निर्णय घेतला आहे." तसेच, देशात तीन सामान्य विमा कंपन्या आहेत. त्यात सरकार १२ हजार ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, अशीही माहिती यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

आणखी बातम्या...

मी कोरोना चाचणी केली, होम क्वारंटाईन होतोय - अमोल कोल्हे

खबरदार, पालकांकडून फी मागाल तर... ; 'या' राज्य सरकारचा खासगी शाळांना सज्जड इशारा

"जे एका भावाला नाही जमलं ते अजित दादांनी शब्दासाठी 'करून दाखवलं'!"

CoronaVirus News : कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात; जाणून घ्या, किंमत...

हॅकर्सच्या निशाण्यावर MS Office युजर्स; ६२ देशांना केलं लक्ष्य

"सारथीच्या उद्घाटनाची बिले थकवणाऱ्यांनी संस्था कशी चालवायची ते शिकवू नये"

Web Title: modi cabinet meeting decisions taken free ration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.